Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस संजय राऊतांना म्हणाले ‘मूर्ख’; ‘त्या’ फोटोवरून नवा वाद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Devendra Fadnavis | अयोध्येतील राम मंदिराचं उद्या म्हणजेच 22 जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. ज्या कारसेवकांचं स्वप्न होतं, अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाला विराजमान करण्याचं ते उद्या पूर्ण होणार आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक फोटो ट्विट केला. हा फोटो नागपूर रेल्व स्टेशनवरचा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नागपुरहून अयोध्येत जात असतानाचा स्वत: चा फोटो फडणवीसांनी टि्वट केला. हा फोटो ट्वीट करून अयोध्या कारसेवेला गेल्याचा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट पुरावा दिला आहे. या ट्विटला ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस संजय राऊतांना म्हणाले ‘मूर्ख’

तुम्हाला काय पुरावा द्यायचा? तुमचे लोक तिथून पळून गेले. बाळासाहेब ठाकरेंनी याची जबाबदारी स्विकारली. नागपूरच्या स्टेशनवरचा फोटो आहे. आमच्याकडे घुमटावरचे फोटो, व्हीडिओ आहेत. तुम्ही नागपूर स्टेशनवर फिरायला गेला असाल, असं संजय राऊत म्हणाले. या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis | “मी मुर्खांना उत्तर देत नाही”

मी मुर्खांना उत्तर देत नाही. त्यामुळे त्यांना कुठलंही उत्तर नाही, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. मला नवभारत प्रकाशित होतं. या वृत्तपत्रातून त्यावेळेचा अंक पाठवला. एका फोटोग्राफर हा फोटो काढला होता. तो त्यांनी पाठवला त्यांचे आभार मानत मीट ट्विट केलं आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.

जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीची आठवण पुन्हा मला झाली. त्या आनंदात मी ट्विट केलं आहे. उत्तर देण्याच्या भानगडीतही मी पाडायचं नसतं. हे तेच लोक आहे. ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व नाकारलेला आहे, असं फडणवीस म्हणालेत.

मी माझ्या आनंदा करता तो फोटो ट्विट केला आहे. संपूर्ण देश हा राममय झाला आहे. मी राम भक्त आहे. मी कारसेवक आहे. मी सुद्धा राममय आहे, असं फडणवीस म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Plane crashed in Afghanistan | सर्वात मोठी बातमी! मॉस्कोला जाणारं विमान अफगाणिस्तानात कोसळलं

Ram Mandir | 22 जानेवारीला काय बंद काय चालू?; वाचा एका क्लिकवर

Rashmika Mandanna च्या डिपफेक प्रकरणी सर्वात मोठी माहिती समोर!

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांनी केली मोठी घोषणा, म्हणाल्या ‘लवकरच…’

मोदींना तोंड दाखवलं नाही; लैंगिक छळाचे आरोप अन् Brijbhushan Singh यांचा खुलासा