Rashmika Mandanna च्या डिपफेक प्रकरणी सर्वात मोठी माहिती समोर!

Rashmika Mandanna

Rashmika Mandanna | दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना कायम आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते. आपल्या चाहत्यांसाठी रश्मिका नवनवीन फोटोज पोस्ट करत असते. दरम्यान काही महिन्यांपूर्वी रश्मिकाचा डिपफेक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. तिचा व्हिडीओ पाहून चाहते तसेच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. सोशल मीडियावर देखील रश्मिकाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र या डीपफेक व्हिडीओबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी रश्मिकाचा (Rashmika Mandanna) डिपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध लावला. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान, डीपफेक प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचा यापूर्वीही अनेक प्रकारच्या सायबर गुन्ह्यात सहभाग असल्याचं सांगण्यात येत आहे. याच आरोपीने रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ तयार केला असल्याची माहिती आहे.

स्वतः आरोपीने दिली कबुली

डीपफेक व्हिडीओ (Rashmika Mandanna) प्रकरणी मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून हा व्हिडीओ मीच बनवला अशी कबुली स्वतः आरोपीने दिली आहे. या आरोपीला दिल्ली पोलिसांनी दक्षिण भारतातून अटक केली आहे. सध्या या आरोपीची पोलिस चौकशी करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन (IFSO) युनिटमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एफआयआर नोंदवल्यानंतर, IFSO युनिटकडून मेटाकडे व्हिडीओची यूआरएल आणि इतर तपशील देण्याबाबत सांगण्यात आलं होतं, जेणेकरुन व्हिडीओ बनवणारा आणि सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या आरोपीची ओळख करता येईल.

रश्मिकाने दिली प्रतिक्रिया-

व्हिडीओ प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींवर रश्मिकाने प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या अधिकृत X अकाउंटवर पोस्ट करत ती म्हणाली, ज्या समुदायाने मला प्रेमाने, पाठिंब्याने स्वीकारलं आणि माझं संरक्षण केलं त्यांची मी आभारी आहे. मी आजच्या तरुण आणि तरुणींना सांगेल की, जर तुमची प्रतिमा तुमच्या संमतीशिवाय कुठेही वापरली किंवा मॉर्फ केली असेल. हे चूक आहे! मला आशा आहे की हे एक स्मरणपत्र आहे की तुमच्याभोवती असे लोक आहेत जे तुम्हाला समर्थन देतील आणि कारवाई केली जाईल!

News Title : rashmika mandanna deepfake video case

महत्त्वाच्या बातम्या-

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांनी केली मोठी घोषणा, म्हणाल्या ‘लवकरच…’

मोदींना तोंड दाखवलं नाही; लैंगिक छळाचे आरोप अन् Brijbhushan Singh यांचा खुलासा

“Pakistan चे माजी PM इम्रान खान यांनाही त्यांच्या देशात मोदींसारखा नेता हवाय”

तिसऱ्या लग्नानंतर Shoaib Malik चा मैदानात पराक्रम; ठरला आशियातील पहिला खेळाडू

Ram Mandir | ‘ही’ मोठी चूक करत असाल तर सावधान! सरकारचा गंभीर इशारा

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .