Ram Mandir | ‘ही’ मोठी चूक करत असाल तर सावधान! सरकारचा गंभीर इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | रामललाच्या अभिषेक सोहळ्याचा उत्साह शिगेला आहे. सोमवारी अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, काही अतिउत्साही किंवा समाजकंट अभिषेक सोहळ्याशी संबंधित कोणत्याही खोट्या बातम्या प्रकाशित करत आहेत. याचाच दाखला देत केंद्र सरकारने गंभीर इशारा दिला आहे. त्यामुळे फेरफार करून बातम्या प्रसारित करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई केली जाणार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे की, काही खोटे, भडकाऊ आणि बनावट मेसेज पसरवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: सोशल मीडियावर हे कृत्य केले जात आहे, ज्यामुळे जातीय सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते. अशा घटनांना आवर घालण्यासाठी काही नियमावली आवश्यक आहे.

सरकारचा गंभीर इशारा

वर्तमानपत्रे, खासगी वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांवरील बातम्या तसेच चालू घडामोडींच्या प्रकाशकांना खोटी माहिती प्रसारित करण्यापासून परावृत्त करण्यास सांगण्यात आले आहे. अशा खोट्या माहितीमुळे देशातील जातीय सलोखा किंवा सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खोटी माहिती अथवा अफवा पसरवणाऱ्यांना कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, रामललाच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा 22 जानेवारीला अयोध्येत होणार आहे, ज्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भगवान श्री राम मंदिराच्या अभिषेकासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत केवळ भारतच नाही तर जगभरातील रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

Ram Mandir कार्यक्रमाचा उत्साह शिगेला

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. खेळाडूंसह कलाकार अयोध्येत हजेरी लावणार आहेत. राम मंदिर ट्रस्टच्या वतीने नामांकितांना निमंत्रण देण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या विधीला 19 तारखेपासून सुरूवात झाली आहे.

 

घरबसल्या भक्तांना रामललाच्या अभिषेक सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. यासाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे. अयोध्येतून या प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण 70 हून अधिक शहरांतील 160 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये दाखवले जाणार आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

News Title- government has issued a warning to those spreading false information about Ram Mandir
 महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2024 चे भविष्य भारत सरकारच्या हाती! पण का? BCCI ने दिली माहिती

Sara Tendulkar अन् गिलच्या नात्याचे ‘शुभ’ संकेत; कॅमेरा दिसताच सचिनच्या लेकीनं चेहरा लपवला, VIDEO

Ram Mandir Ayodhya | 22 तारखेला बॉलिवूडलाही सुट्टी; रामललाच्या कार्यक्रमाचा उत्साह शिगेला

Sharad Pawar | 1980 ची आठवण करून देत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा!

‘पप्पा 26 जानेवारीला डायरेक्ट…’; Manoj Jarange च्या मुलीने केलं आवाहन