Sara Tendulkar अन् गिलच्या नात्याचे ‘शुभ’ संकेत; कॅमेरा दिसताच सचिनच्या लेकीनं चेहरा लपवला, VIDEO

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sara Tendulkar | भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू दिग्गज मास्टर ब्लास्टरची लेक सारा तेंडुलकर कायम प्रसिद्धीच्या झोतात असते. सारा तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांना भुरळ घालते. वन डे विश्वचषकादरम्यान ती अनेकदा टीम इंडियाला चीअर करताना दिसली आहे. बॉलिवूड कलाकारांसोबत अनेकदा पार्टीला हजेरी लावणारी सारा आता शहनील गिलसोबत दिसली. शहनील ही भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिलची बहिण आहे.

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल रिलेशनशिपमध्ये असून ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मागील काही महिन्यांपासून सारा आणि गिलचे नाते जोडले जात आहे. दोघांकडूनही काहीवेळा याबद्दल संकेत देण्यात आले आहेत. अशातच अलीकडेच कॉफी विथ करण या शोमध्ये बोलताना बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने एक सूचक विधान केले होते.

सारानं लपवला चेहरा

“तू शुभमन गिलला डेट करतेस का?, असे सारा खानला विचारले असता तिने म्हटले, “सर्वजण चुकीच्या साराच्या मागे लागले आहेत.” एकूणच गिलला डेट करणारी सारा मी नसून दुसरी एक आहे, असे तिने स्पष्ट केले. अशातच सारा तेंडुलकर गिलच्या बहिणीसोबत स्पॉट झाली अन् पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले. सारा अन् गिल यांच्यात अफेअर असल्याचे बोलले जात आहे. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सारा आणि शहनील गिल एकाच कारमध्ये दिसल्या.

Sara Tendulkar अन् गिलच्या नात्याचे ‘शुभ’ संकेत!

कॅमेरा पाहताच साराने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, सारा आणि शहनील यांच्यात काहीतरी चर्चा सुरू असते. अशातच त्यांना समजते की, कॅमेरा समोर असून आपला व्हिडीओ सुरू आहे. मग सारा तेंडुलकरने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओवरून नेटकरी सारा आणि गिल यांच्या नात्याचे हे शुभ संकेत असल्याचा तर्क लावत आहेत. साराचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

 

दरम्यान, वन डे विश्वचषक 2023 दरम्यान अनेकदा सारा तेंडुलकर प्रेक्षक गॅलरीत दिसली आहे. यावेळी देखील सारा अन् गिल यांच्यात अफेअर सुरू असल्याचे दिसले. कारण अनेकदा गिलच्या खेळीचे साराने टाळ्यांच्या गजरात कौतुक केले होते. चाहत्यांनी देखील स्टेडियममध्ये गिलला अनेकदा साराच्या नावाने हाक मारली आहे. गिलकडे आयपीएल 2024 च्या हंगामासाठी गुजरात टायटन्सच्या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.

सचिनची लेक सारा उच्चशिक्षित असून तिने लंडन विद्यापीठातून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या साराचे लाखो फॉलोअर्स आहेत. सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याची मागील काही काळात चर्चा होती. पण, सचिनने या चर्चांना पूर्णविराम दिला.

News Title- Sara Tendulkar with shahneel gill video viral
महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir Ayodhya | 22 तारखेला बॉलिवूडलाही सुट्टी; रामललाच्या कार्यक्रमाचा उत्साह शिगेला

Sharad Pawar | 1980 ची आठवण करून देत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा!

‘पप्पा 26 जानेवारीला डायरेक्ट…’; Manoj Jarange च्या मुलीने केलं आवाहन

Sania Mirza | शोएबसोबत लग्न करण्यापूर्वी सानियाने ठरलेलं लग्न मोडलेलं; ‘या’ व्यक्तीच्या होती प्रेमात

Sana Javed | शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याशी केलं होतं पहिलं लग्न!