Sana Javed | शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याशी केलं होतं पहिलं लग्न!

Sana Javed | पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने (Shoaib Malik) पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी (Sana Javed) तिसऱ्यांदा विवाह केला आहे.  शोएबने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी (Sania Mirza) विभक्त होत तिसऱ्यांदा संसार थाटला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर शोएबने तिसरे लग्न करत सर्वांनाच धक्का दिला आहे. त्याची पत्नी सना शेख हिचाही हा दूसरा विवाह आहे.

सनाने पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिला आहे. मात्र, सर्वांनाच तिचा पहिला पती कोण होता, याबाबत जाणून घ्यायचे आहे. तसेच, शोएबने कुणासाठी सानियाला धोका दिला, याबाबतही लोक उत्सुक आहेत.

कोण आहे शोएबची तिसरी पत्नी?

सना शेख (Sana Javed) ही शोएबची तिसरी पत्नी बनली आहे. 25 मार्च 1993 मध्ये सौदी अरबमध्ये जन्मलेली सना आता 30 वर्षांची आहे. सना पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 2012 मध्ये ‘शेहर-ए-जात’ या चित्रपटातून तीने फिल्मी दुनियेत प्रवेश केला. यासोबतच तीने अनेक मालिकांमध्येही भूमिका केली.’खानी’ या रोमँटिक ड्रामानंतर ती प्रसिद्धीस आली. सनाने बेहद, शारीक-ए-हयात, दीनो की दुल्हनिया आणि आय लव यू जादा अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik)

सना जावेदचा पहिला पती कोण?

शोएबची तिसरी पत्नी सना जावेदचा (Sana Javed) हा दूसरा विवाह आहे. तीने यापूर्वी 2020 मध्ये पाकिस्तानी गायक तथा कलाकार उमैर जसवालसोबत (Umair Jaswal) पहिले लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या काही दिवसांनंतरच ते दोघे वेगळे राहायला लागले. दोघांनी आपल्या सोशल मिडियावरून सोबतचे फोटोदेखील हटवले आहेत.

उमैर जसवाल हा पाकिस्तानमधला प्रसिद्ध कलाकार आहे. तो गाणे देखील गातो. 2008 मध्ये त्याने गाणे गाण्यास सुरुवात केली. इस्लामाबादमध्ये जन्मलेल्या उमैर जसवालला पाच भाऊ आहेत. त्याचे वडील पाकिस्तानचे प्रसिद्ध वैज्ञानिक आहेत. उमैर जसवालचे ‘तन्हा’ आणि ‘उम्मीद’ हे गाणे प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या तीन वर्षानीच उमैर जसवालशी वेगळे होत सनाने दुसऱ्यांदा लग्न करत नवीन संसार थाटला आहे.

आपल्या इंस्टाग्रामवर सनाने शोएब मलिकसोबत लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. यावरच शोएबने ‘अल्हम्दुलिल्लाह’ अशी कमेन्टदेखील केली आहे. हे फोटो पोस्ट होताच वाऱ्यासारखे वेगाने व्हायरल झाले. यामुळे सानियाच्या चाहत्यांना मोठे दुःख झाले आहे.

News Title : Sana Javed first husband Umair Jaswal

महत्वाच्या बातम्या- 

Post Office | पोस्टाची भन्नाट योजना; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई

PPF Vs SIP, कुठे मिळेल दुप्पट परतावा, जाणून घ्या

Rashibhavishya | ‘या’ राशींनी सावध रहावं, नाहीतर होईल मोठं आर्थिक नुकसान

Ajit Pawar | बाबांनो तुम्हाला विनंती करतो एक, दोन अपत्यावर थांबा नाहीतर…- अजित पवार

Shoaib Malik | घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान शोएब मलिकनं केलं दुसरं लग्न; सर्वांनाच दिला धक्का