Ajit Pawar | बाबांनो तुम्हाला विनंती करतो एक, दोन अपत्यावर थांबा नाहीतर…- अजित पवार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | एक किंवा दोन आपत्यावर थांबा. खासदार असताना असलेली लोकसंख्या आणि आता असलेली लोकसंख्या ही तुलनेने खुपचं वाढली असून काही दिवसांनी ब्रह्मदेव आला तरी घरं बांधून देऊ शकणार नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते पिंपरीत पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यक्रमात बोलत होते.

“एक, दोन अपत्यावर थांबा नाहीतर”

माझी तुम्हाला विनंती आहे, एक किंवा दोन आपत्यावर थांबा. मी इथला खासदार असताना असलेली लोकसंख्या आणि आता असलेली लोकसंख्या ही तुलनेने खुपचं वाढलेलीये. लोकसंख्या अशीच वाढत गेली ना मग अगदी ब्रह्मदेव आला तरी सर्वांना घरं देऊ शकणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलंय.

पंतप्रधान आवास योजनेची सोडत ही पारदर्शक आहे. तुम्ही अगदी माझ्याकडे आले अन् म्हणाले दादा माझी चिठ्ठी काढा तर ते मला ही जमणार नाही. मलाच काय तर कोणाच्याच हातात हे नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.

अशा शहाण्यांना मी सरळ करणार- अजित पवार

नशिबाने तुमचा नंबर लागणार आणि हे शहाणे म्हणतात बघा माझ्यामुळंच तुमचं स्वप्न पूर्ण झालं, असं म्हणून ते पैशांची लुबाडणूक करतात. अशा शहाण्यांना मी सरळ करणार आहे, असं देखील अजित पवारांनी म्हटलंय.

पंतप्रधान आवास योजनेत काहींचं नशीब उजळेल. मात्र काहींना घरं मिळणार नाहीत. त्यामुळं नाउमेद होऊ नका. तर ज्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल, म्हणून अगदीच भारावून जाऊ नका. पैसे वाचले म्हणून ते उधळू नका. नाहीतर चौफुला, टेंभुर्णीला जाऊन तिथं उधळपट्टी करू नका, असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे.

मी लवकर आल्यानं काहींची अडचण झाली. सकाळी-सकाळी लवकर सुरुवात केली ते कामांसाठी बरं पडतं. पण त्यामुळं काहींची अडचण झाल्याचं दिसतंय, असा टोला अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

महत्त्वाच्या बातम्या- 

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे रेट

Manoj Jarange | ‘छातीवर गोळ्या लागल्या तरी…’; मनोज जरांगे रडले

Gold-Silver Price Today | सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

T20 World Cup 2024 | हार्दिक पांड्या की शिवम दुबे?, वर्ल्डकपला कुणाला संधी, मोठी माहिती समोर

Team India चं टेंशन वाढवणारी बातमी समोर!