T20 World Cup 2024 | हार्दिक पांड्या की शिवम दुबे?, वर्ल्डकपला कुणाला संधी, मोठी माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

T20 World Cup 2024 | वनडे चषकमध्ये भारताला पराभूत करत ऑस्ट्रेलिया जगज्जेती ठरली होती. या पराभवानंतर सर्व भारतीयांना मोठा धक्का बसला होता. मात्र आता आगामी टी 20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) टीम इंडियाकडून भारतीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. भारताला आतापासूनच विजयाचे पक्के दावेदार म्हटले जात आहे. यासाठी टीम इंडियाच्या संघात कुणाला स्थान मिळणार याबाबत अद्याप निर्णय घेणे बाकी आहे.

अशातच भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याने ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (hardik pandya) आणि बॅट्समन शिवम दुबे (Shivam Dubey) या दोघांनाही स्थान मिळणार असं वक्तव्य केलं आहे. तर काहींच्या मते दोघांपैकी एकालाच घेतलं जाईल असंही म्हटलं जात आहे.

हार्दिक पांड्या की शिवम दुबे?

वनडे विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्याला मोठी दुखापत झाली होती. या कारणाने तो विश्वचषक देखील खेळू नाही शकला. तेव्हापासून तो संघाबाहेरच आहे. तर, दुसरीकडे शिवम दुबेला टीम इंडियात (T20 World Cup 2024) संधी मिळाली आहे. त्याने दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरोधात आपली कामगिरी दाखवत सर्वांनाच प्रभावित केलं आहे. यात तो मालिकावीर पुरस्कार विजेता देखील ठरला.

त्यामुळे हार्दिक पांड्या ऐवजी शिवम दुबेला घेतले जाईल, असेही म्हटले जात आहे. तर, काही जणांच्या मते हार्दिक पांड्या दुखापतीमधून सावरला तर शिवम दुबेला संधी मिळणं कठीण असल्याचे म्हटले जात आहे. यावरच जहीर खान याने मोठे विधान केले आहे. जे आता चर्चेत आले आहे.

माजी भारतीय गोलंदाजाचे मोठं वक्तव्य

“भारतीय संघाला जर सहाव्या गोलंदाजीचा पर्याय हवा असेल, किंवा बॅकअपसह खेळायचे असेल तर हार्दिक आणि शिवम या दोघांनाही घ्यावे लागणार आहे. पण, हे करत असताना तुम्हाला दोन विकेटकिपरच्या ऐवजी एका विकेटकिपरसह मैदानात उतरावे लागेल. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या दोघांनाही 20 विश्वचषकाचे तिकीट मिळेल.”, असे जहीर खान (zaheer khan) म्हणाला आहे.

शिवम दुबेबाबत म्हटले तर, मागच्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये त्याने धोनीच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे. तर, नुकत्याच भारत आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या टी 20 मालिकेतही (T20 World Cup 2024) त्याने छाप सोडली आहे. त्याने फलंदाजीसोबत गोलंदाजी करत आपल्या अष्टपैलू खेळीचे प्रदर्शन केले आहे. पण, त्याला संधी मिळेल की नाही याबाबत अद्याप तरी संभ्रमच आहे.

News Title :  T20 World Cup 2024 hardik pandya vs shivam dube

महत्त्वाच्या बातम्या-

Rashmika Mandanna | ‘मी जोरात ओरडले, रडले…’; ‘या’ अभिनेत्याचं नाव घेत रश्मिका मंदानाने केला खुलासा

Ram Mandir | पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूने शेअर केले श्रीरामाचा फोटो, म्हणाला ‘माझा रामलल्ला…’

Ira Khan Wedding Teaser | आमिरच्या लेकीने शेअर केला लग्नाचा टीझर, पाहा व्हिडीओ

Ram Mandir | रामलल्लाच्या मूर्तीची गर्भगृहात स्थापना, ‘या’ ठिकाणी विराजणार भाऊ लक्ष्मण-भरत आणि शत्रुघ्न

Ram Mandir | रामलल्लाची मूर्ती आली समोर; भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे फोटो