Ira Khan Wedding Teaser | आमिरच्या लेकीने शेअर केला लग्नाचा टीझर, पाहा व्हिडीओ

Ira Khan Wedding Teaser

Ira Khan Wedding Teaser | बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) आणि नूपुर शिखरे (Nupur Shikhare) यांचा उदयपुरमध्ये मोठ्या उत्साहात विवाहसोहळा पार पडला. आयरा आणि नूपुर यांनी अगोदर नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. नंतर त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने दुसऱ्यांदा लग्न केलं. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.

आता आयराने लग्नाचा टीजर शेअर केला आहे. त्यात लग्नातील अनेक क्षण टिपण्यात आले आहेत. यावर चाहत्यांच्याही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये आयराची एंट्रीने या टीजरची सुरुवात होते. यात अभिनेता आमीर खान भावूक झाल्याचंही दिसून आलं.

टीजरची (Ira Khan Wedding Teaser) सुरुवात सुंदर अशा डोंगरांच्या दृश्यांनी होते. नंतर आमिर आणि त्याची पत्नी रिना दत्ता यांची झलक दिसून येते. लेक आयराच्या लग्नामुळे आमिरची पूर्व पत्नी रिना यांच्यात चांगला बॉन्ड दिसून आला. दोघेही लेकीचा हाथ पकडून लग्नमंडपात तिला घेऊन जातात. यावेळी आमिरची दुसरी पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद यांनाही दाखवण्यात आलं आहे.

आयराने शेअर केला लग्नाचा टीजर

आयराचा नवरा नूपुर शिखरे याने सर्वांसमोर पुन्हा एकदा आपल्या प्रेमाची कबुली दिली. ‘तुझ्या प्रेमात पडणे हे माझ्या हातात नव्हते. मात्र, तुझ्याशी लग्न करणे हे मात्र माझ्या हातात होते. तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहे. मला कायम तुझ्या सोबत राहायचे आहे.’,असे नूपुर यावेळी आयराला म्हणताना दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

नूपुर आणि आयरा दोघांनाही यावेळी भरून आले. दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन एकमेकांना दिले. याचा टीजर (Ira Khan Wedding Teaser) पाहून आता सोशल मिडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. चाहत्यांकडून नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

रिना दत्ता आणि किरण रावचं होतंय कौतुक

आयराने व्हिडीओ शेअर (Ira Khan Wedding Teaser) करत म्हटले की, “हा फक्त एक टीझर आहे, पण तो अवास्तविक नाही. आम्ही याची वाट पाहू नाही शकलो. आम्हाला फक्त आमच्या आवडत्या लोकांसोबत पर्वतांमध्ये हा क्षण साजरा करायचा होता. आम्ही तिथे आलो तेव्हा आम्हाला पाहून सगळेच दंग झाले. या दिवसातील सर्व प्रेम आणि भावना शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. पण, आम्ही कृतज्ञ आहोत की आमच्याकडे या क्षणाचा व्हिडीओ आहे, असं कॅप्शन आयराने दिलं आहे.

आपला पती नूपुरला तीने ‘आता आपण लॉर्ड ऑफ द रिंग्जचा तिसरा पार्ट पाहू शकतो.’, असं म्हटलंय. या व्हिडीओनंतर आमिर आणि त्याची पत्नी रिना दत्ता तसेच किरण राव यांचें कौतुक होत आहे. आपल्या मुलीसाठी या दोघींचं एकत्र येणं खरंच ते चांगले व्यक्ती असल्याचा पुरावा असल्याचं एका चाहत्याने म्हटलंय.

News Title- Ira Khan Wedding Teaser

महत्वाच्या बातम्या- 

Rohit Pawar | सर्वात मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीचा झटका

Student Niamh Hearn | रोज पार्ट्या करुन करुन तरुणी होत चालली होती जाड, एके दिवशी अचानक…

Google Chrome ने बदलली पॅालिसी, आता अशाप्रकारे सर्च केलं तर खासगी राहणार नाही!

Jallikattu Bull | शर्यतीच्या बैलाला जबरदस्ती खाऊ घातला कोंबडा, 3 जणांवर मोठी कारवाई

गुंतवणूकदारांना Share Market तज्ज्ञांचा सल्ला; ‘हा’ स्टॉक बनेल रॉकेट

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .