Student Niamh Hearn | रोज पार्ट्या करुन करुन तरुणी होत चालली होती जाड, एके दिवशी अचानक…

Student Niamh Hearn | आताच्या तरुण पिढीला पबमध्ये जाणे, मद्यपान करणे, सिगरेट फुंकणे याचा अत्यंत शौक असल्याचे दिसते. पार्ट्या करणे हा तर एक ट्रेंडच बनला आहे. हा ट्रेंड भारतातही रूढ होत आहे. अशा पार्ट्यामध्ये अनेक गैरप्रकार घडल्याचंही अनेकदा समोर आलं आहे. मात्र एका तरुणीसोबत (Student Niamh Hearn ) घडलेली घटना ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल.

‘आई’ हा शब्द सर्वांत पवित्र शब्द आहे. आई बनणे हे प्रत्येक महिलेसाठी खुप आनंदाची गोष्ट असते. आई झाल्यानंतर तिच्यात अनेक बदल होतात. नऊ महीने एक महिला आपल्या बाळाला आपल्या गर्भात मोठे करत असते. आई होणार या बातमीनेच तिचं सर्व जग बदलून जाते. मात्र एका महिलेला नऊ महीने झाले तरी ती, गरोदर असल्याचे कळलेच नाही. त्यात नऊ महीने तीने सतत पार्ट्या केल्या. तरी तिला आपण गरोदर असल्याचा साधा भास देखील झाला नाही. पार्ट्या करत करत तीने अखेर एका बाळाला जन्मही दिला. ही अजीब घटना समोर आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

“अपेंडिक्सच्या त्रासासाठी हॉस्पिटलला गेली अन् दिला बाळाला जन्म”

ही घटना भारतातील नाही तर यूनाइटेड किंगडममधील आहे. येथे एका 21 वर्षीय महिलेला(Student Niamh Hearn)  9 ऑगस्ट 2022 मध्ये अचानकच पोटाचा त्रास होऊ लागला. तिला वाटले की, हा अपेंडिक्सचा प्रकार असेल. या त्रासाबद्दल तीने आपल्या मैत्रिणीशी खुलासा केला. त्यानंतर त्यांनी त्वरित 111 वर कॉल करून अॅम्ब्युलेन्सला बोलवले. तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर या महिलेला कळाले की, ती गरोदर आहे. आणि तिला होणारा त्रास हा डिलीवरी पूर्वीचा होता. हा अचानक मोठा धक्का या महिलेला मिळाला. या महिलेचे नाव नियाम हर्न (Niamh Hearn) असे आहे. तीने हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला. मात्र, नऊ महीने तिला कळलेच नाही की, ती गरोदर आहे. याबाबत नंतर तीने खुलासा केला.

महिलेने दिला बाळाला जन्म-

यूनिवर्सिटीमध्ये शिकत असताना अशी एक रात्र गेली नाही, ज्या दिवशी नियाम हर्नने (Student Niamh Hearn ) पार्टी केली नाही. अशातच नशेत असताना तीने एका मुलासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. यानंतर तीने दहा वेळा प्रेग्नेंसी टेस्ट केली. मात्र, या सर्व टेस्ट तेव्हा नेगेटिव्ह आल्या. मात्र, तिच्या पोटाचा आकार दिवसेंदिवस वाढतच चालला होता. हे बघून नियामला वाटले की, आपण जाड होत आहोत. या काळात तीने खूप पार्ट्या केल्या. मद्याचे सेवन केले.

सायंकाळी 6 वाजेपासून ते रात्री 2 वाजेपर्यंत ती पार्टीमध्ये धूत असायची. नऊ महीने आपल्या गर्भात एक बाळ वाढतेय याची साधी कल्पना नसताना तीने रोज पार्टी केली. तरी तिचे बाळ पूर्णपणे स्वस्थ निघाले. आता तिचे बाळ 17 महिन्यांचे झाले आहे आणि अगदी स्वस्थ आहे. तिच्या घरच्यांनी देखील बाळाचा स्वीकार केला आहे. या अजीब घटनेचा खुलासा स्वतः नियाम हर्नने केला आहे. ही घटना ऐकून सोशल मिडियावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

News Title : student Niamh Hearn gives birth to baby

महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir l 22 जानेवारीला कुठल्या राज्यांनी दिली सुट्टी, महाराष्ट्रात पण सुट्टी देणार?, मोठी बातमी

Rohit Sharma ला भारतीय संघातून काढून टाकणार होते, मात्र… मोठी बातमी आली समोर

शेतकऱ्याच्या पोरानं करून दाखवलं; MPSC परिक्षेत विनायक पाटील राज्यात पहिला आला

Indian Women Hockey Match l MS Dhoni मॅच पहायला पोहोचला आणि भारतीय संघ हारला!

MHADA Lottery 2024 l Mhada कडून आनंदाची बातमी, 5311 घरांसाठी लवकरच काढणार लॅाटरी