Google Chrome ने बदलली पॅालिसी, आता अशाप्रकारे सर्च केलं तर खासगी राहणार नाही!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Google Chrome | सोशल मिडियावर आपण सर्रासपणे आपल्या आयुष्यातील अनुभव प्रकट करत असतो. फोटो पोस्ट करत असतो. या सोशल साईट आपली प्रायवसी कधीच उघड होऊ देणार नाही, याची शाश्वती देत असले तरी, प्रायवेट डेटा विकला गेला, किंवा त्याचा वापर करण्यात आला अशा अनेक घटना घडल्या आहेत. आता गुगलनेही (Google Chrome) आपल्या पॉलिसीमध्ये गुपितपणे बदल केले आहेत. ज्याची तुम्हाला अजून कल्पनाच नाही.

तुम्ही जर काही सर्च करण्यासाठी गुगल क्रोमवर इन्कॉग्निटो मोडचा वापर करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. कारण, इन्कॉग्निटो मोडमध्ये सर्च करणे तुमच्यासाठी बिलकुल सुरक्षित नाही. यावर तुमची प्रायवसी भंग होऊ शकते.

“… तर तुमची अॅक्टिविटी ट्रॅक केली जाऊ शकते”

यापूर्वी गुगल क्रोमच्या (Google Chrome) इन्कॉग्निटो मोडवर तुम्ही काय सर्च करताय हे कुणीच पाहू शकत नव्हतं. मात्र आता यात बदल करण्यात आले आहेत. 2020 मध्ये गुगलवर या प्रकरणी एक तक्रार करण्यात आली होती. यानंतर गुगलने आपल्या पॉलिसीमध्ये अनेक बदल केले.

यानुसार गुगल क्रोमच्या नव्या वर्जन 122.0.6251.0 चा इन्कॉग्निटो मोड (Google Chrome Incognito Mode) तुम्ही ओपन केला तर तुम्हाला एक चेतावनी आलेली दिसेल. ज्यात गुगल ब्राउजिंग हिस्ट्री सेव्ह करत नाही, अशी सूचना आलेली दिसेल. तसेच इन्कॉग्निटो मोडवर ब्राउजिंग केल्यास तुमचे एंप्लायर, शाळा, ऑफिस आणि इंटरनेट सर्विस प्रोवाइडर तुमची अॅक्टिविटी ट्रॅक केली जाऊ शकते.

गुगलने पॉलिसित केले बदल

गुगलच्या (Google Chrome) सुचनेतूनच हे दिसून येते की आता तुमच्या प्रायवसीवर हॅकरची नजर असणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करताय यावर सर्वांची नजर असणार आहे. म्हणून गुगल क्रोमच्या इन्कॉग्निटो मोडवर जाऊन काहीही सर्च करताना आता एकदा विचार नक्की करा.

2020 मध्ये एका व्यक्तीने गुगलवर आरोप केले होते की गुगल (Google Chrome) युजरचा रियल टाइम डेटा ट्रॅक करून त्याला सुरक्षित ठेवतो. मात्र हे आरोप गुगलने फेटाळले होते. तसेच इन्कॉग्निटो मोड पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही म्हटलं होतं. मात्र नंतर गुगलने आपली चूक स्वीकारत गुपितपणे पॉलिसीमध्ये बदल केले.

News Title- Google Chrome secretly changed policy

महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir l 22 जानेवारीला कुठल्या राज्यांनी दिली सुट्टी, महाराष्ट्रात पण सुट्टी देणार?, मोठी बातमी

Rohit Sharma ला भारतीय संघातून काढून टाकणार होते, मात्र… मोठी बातमी आली समोर

शेतकऱ्याच्या पोरानं करून दाखवलं; MPSC परिक्षेत विनायक पाटील राज्यात पहिला आला

Indian Women Hockey Match l MS Dhoni मॅच पहायला पोहोचला आणि भारतीय संघ हारला!

MHADA Lottery 2024 l Mhada कडून आनंदाची बातमी, 5311 घरांसाठी लवकरच काढणार लॅाटरी