MHADA Lottery 2024 l Mhada कडून आनंदाची बातमी, 5311 घरांसाठी लवकरच काढणार लॅाटरी

MHADA Lottery 2024 l वाढत्या महागाईमुळे कित्येक नागरिकांचे स्वप्न अधुरेच राहिले जाते. शहरात आपलं छोटस का होईना हक्काचं घर असावं असं प्रत्येक नागरिकाला वाटत असते. मात्र सर्वसामन्यांचं हे स्वप्न साकार होणं शक्य नाही. अशावेळी सर्वसामान्य नागरिक म्हाडाचे घर खरेदी करण्यास (MHADA Lottery 2024) प्राधान्य देत असतात. मात्र म्हाडाचे घर खरेदी करण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि त्यानंतर लॉटरीची वाट पाहावी लागते.

MHADA Lottery 2024 l 5311 घरांसाठी लवकरच सोडत होणार :

अशातच आता कित्येक नागरिक म्हाडाच्या कोकण विभागातील 5311 घरांची वाट पाहत आहेत. मात्र ही प्रक्रिया कित्येक महिन्यांपासून रखडलेली आहे. या घरांच्या सोडतीची तब्बल 24 हजारांहून अधिक अर्जदार प्रतीक्षेत आहेत. मात्र कित्येक महिने उलटून देखील अर्जदारांना वाट पाहावी लागत आहे.

मात्र आता अर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर आहेत. तसेच 22 जानेवारीला राम मंदिराचे उदघाटन झाल्यावर व 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा लॉटरी काढणार असल्याचे म्हणले जात आहे.

24 हजार अर्जदार प्रतीक्षेत :

कोकण विभागातील 5311 घरांसाठी 24 हजार अर्जदारांनी अर्ज सादर केले आहेत. तसेच हा अर्ज करताना अर्जदाराला 5000 रुपयांपासून ते 15000 रुपयांपर्यंत रक्कम भरावी लागत असे. त्यामुळे म्हाडाचे घर घेण्यासाठी कित्येक अर्ज येत असल्याचे दिसत आहे.

याशिवाय म्हाडाच्या घरांच्या सोडतीची घोषणा न झाल्याने अर्जदार प्रचंड नाराज झाले असल्याचे दिसत आहेत. याशिवाय अर्जदारांनी सोशल मीडियावर देखील नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे म्हाडाची (MHADA Lottery 2024) लवकरात लवकर लॉटरी जाहीर करण्याची मागणी अर्जदारांकडून करण्यात येत आहे.

MHADA Lottery 2024 l कोकण मंडळाने दिली महत्वाची माहिती :

कोकण विभागातील लॉटरीची घरे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात असून लॉटरीची तारीख अर्जदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत लॉटरीची तारीख निश्चित केली जाईल असे कोकण मंडळाने सांगितले आहे.

News Title : MHADA Lottery 2024

महत्त्वाच्या बातम्या –

Pakistan Targeted Militant Targets In Iran l या देशाने केला पाकिस्तानवर हल्ला

Solapur Labor Colony Opening l आज हजारो कामगारांना मिळणार हक्काचं घर! देशातील सर्वात मोठ्या कामगार वसाहतीचे उदघाटन

Ram Mandir साठी महिन्याला 2 कोटी रुपयांची देणगी; ट्रस्टने मागवल्या ‘या’ गोष्टी

Ram Mandir Live Telecast l 22 जानेवारीला घरबसल्या पाहू शकता राम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

Rivaba Jadeja | जड्डूच्या घरात राजकीय कलह; राम मंदिरावरून वहिणी-नणंद भिडल्या!