Solapur Labor Colony Opening l आज हजारो कामगारांना मिळणार हक्काचं घर! देशातील सर्वात मोठ्या कामगार वसाहतीचे उदघाटन

Solapur Labor Colony Opening l पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी देशातील पहिल्या सर्वात मोठ्या सागरी अटल सेतूचे उदघाटन केले आहे. अशातच आता आज (19.जाने) पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर येथील देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत. या उदघाटनानंतर राज्यात मोठा बदल पाहायला मिळणार आहे.

कामगारांना दिलासा मिळणार ! :

आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान सोलापूर येथे दाखल होणार आहेत. यावेळी सोलापूर येथील कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यानिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.

मात्र या गृहप्रकल्पामुळे देशाच्या उदोगधंद्याला चालना देखील मिळणार आहे. तसेच सोलापूर हे शहर कामगारांची ओळख होईल. सूतगिरणीमध्ये काम करणारे कामगार वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम यासह विविध क्षेत्रात हजारो (Solapur Labor Colony Opening) सोलापुरमध्ये काम करत आहे. मात्र त्यांना आता दिलासा मिळणार आहे. कारण आता झोपडपट्टीत राहून हाल सहन करणाऱ्या कामगारांना आता स्वतःच्या हक्काचं घर मिळणार आहे.

Solapur Labor Colony Opening l देशातील सर्वात मोठ्या कामगार वसाहतीचे वैशिष्ट्ये :

आज उदघाटन होणाऱ्या कामगार वसाहत ही 350 एकर परिसरात बांधण्यात आली आहे. तसेच या जागेत तब्बल 834 इमारती उभारण्यात (Solapur \ News) आल्या आहे. तर या इमारतीत 30 हजार फ्लॅट्स बांधण्यात आले आहेत. एकंदरीत या गृहविकास प्रकल्पामध्ये सुमारे 30 हजार कामगारांना स्वतःच हक्कच घर मिळणार असल्याचं दिसत आहे.

यामुळे कुंभारीत साकारण्यात आलेली वसाहत ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत (Solapur Labor Colony Opening) असल्याचं सांगण्यात येतात आहे. आयुष्यभर झोपडपट्टीत राहणाऱ्या कामगारांना स्वतःच हक्काच घर मिळावं. या उद्दिष्टाने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे साकारण्यात आली आहेत.

सलग 4 वर्ष या वसाहतीचे बांधकाम करण्यात आले आहे. तर तब्बल 10 हजार कामगारांच्या अथक परिश्रमामुळे या भव्यदिव्य अशा रे नगर प्रकल्प साकारला आहे.

News Title : Solapur Labor Colony Opening

महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir साठी महिन्याला 2 कोटी रुपयांची देणगी; ट्रस्टने मागवल्या ‘या’ गोष्टी

Ram Mandir Live Telecast l 22 जानेवारीला घरबसल्या पाहू शकता राम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

Rivaba Jadeja | जड्डूच्या घरात राजकीय कलह; राम मंदिरावरून वहिणी-नणंद भिडल्या!

Phone Overheating l तुमचा मोबाईल वारंवार गरम होतोय तर या गोष्टी टाळा

Ram Mandir | …म्हणूनच कारसेवकांवर गोळ्या झाडल्या; मुलायम यांच्या लहान भावानं सांगितलं कारण