Ram Mandir | …म्हणूनच कारसेवकांवर गोळ्या झाडल्या; मुलायम यांच्या लहान भावानं सांगितलं कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | सध्या सर्वत्र राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण आहे. देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी येत्या सोमवारी अयोध्येत एकवटणार आहे. यासाठी राम मंदिर ट्रस्टच्या वतीने नामांकितांना निमंत्रण देण्यात आले आहे. दुसरीकडे, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून राजकारण देखील चांगलेच तापले आहे. अशातच उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य आणि समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते शिवपाल यादव यांनी कारसेवकांबाबत एक विधान केले आहे.

शिवपाल यादव म्हणाले की, अयोध्येतील कारसेवकांवर गोळीबार संविधान वाचवण्यासाठी करण्यात आला. शिवपाल यादव 1990 मध्ये कारसेवकांवर झालेल्या गोळीबारावर वक्तव्य केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संविधान वाचवण्यासाठी कारसेवकांवर गोळीबार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सपा विरूद्ध भाजप शाब्दिक युद्ध

त्याचवेळी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत शिवपाल म्हणाले की, हा राजकीय कार्यक्रम आहे. जिथे शंकराचार्य, महंत असायला हवे होते तिथे भाजपचे नेते दिसत आहेत. शिवपाल यादव यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देत भाजपने सपावर हल्लाबोल केला. भाजप नेते राकेश त्रिपाठी म्हणाले की, माफी मागण्याऐवजी समाजवादी पार्टी कारसेवकांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. धार्मिक तुष्टीकरणामुळे सपा रामभक्तांचा देखील अपमान करत आहे.

दरम्यान, दिवंगत मुलायम सिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने कार सेवकांवर गोळीबार केला होता. याचाच दाखला देत शिवपाल यादव यांनी भाजपला सुनावले पण ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. 2 नोव्हेंबर 1990 रोजी अयोध्येत कारसेवकांवर गोळीबाराची घडलेली घटना पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. संविधान वाचवण्यासाठी हा गोळीबार आवश्यक होता असे म्हणत शिवपाल यादव यांनी त्या गोळीबाराचे समर्थन केले आहे.

न्यायालयाचा आदेश सरकारला मान्य करणे भाग पडले. भाजपच्या नेत्यांनी न्यायालयाचा आणि संविधानाचा विश्वासघात केला होता, असेही शिवपाल यांनी सांगितले. तर, भाजप नेते राकेश त्रिपाठी यांनी माफी मागणे तर दूरच, समाजवादी पार्टी कारसेवकांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले.

Ram Mandir वरून भाजपच राजकारण – शिवपाल

केंद्रातील मोदी सरकार ईडी आणि सीबीआयच्या मदतीने विरोधकांना धमकवत असून विरोधकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप शिवपाल यादव यांनी केला. शिवपाल म्हणाले की, भाजप विरोधी नेत्यांना धमक्या देऊन निवडणुका जिंकण्याची रणनीती अवलंबत आहे. सत्ताधारी भाजप राम मंदिराच्या कार्यक्रमावरून राजकारण करत असल्याचेही शिवपाल यांनी नमूद केले.

News Title- Shivpal Yadav has made a big statement about car servants
 महत्त्वाच्या बातम्या –

“आता तुझ्यासोबत म्हातारा व्हायचंय…”, Arbaaz Khan ची पत्नी शूरासाठी खास पोस्ट

जगातील सर्वात श्रीमंत देशात Beer मिळणार नाही! विक्री थांबणार, जाणून घ्या कारण

Government | मुलाला कोंचिगला टाकताय? 16 वर्ष पूर्ण आहेत ना? वाचा सरकारची नवी नियमावली

Sachin Tendulkar चा 50 व्या वर्षीही जलवा ‘कायम’, इरफान पठाणचा ‘विजयी’ षटकार

Ram Mandir प्राणप्रतिष्ठेपूर्वी सरकारचे केंद्रीय कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट, घेतला मोठा निर्णय