Ram Mandir प्राणप्रतिष्ठेपूर्वी सरकारचे केंद्रीय कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट, घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | अयोध्येमध्ये येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन होणार आहे. यासाठी आतापासूनच जोरदार तयारी करण्यात येत आहे. देशातील अनेक दिग्गज या भव्य सोहळ्याला उपस्थिती लावणार आहे. आता याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्राणप्रतिष्ठेपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट मिळाले आहे.

कर्मचाऱ्यांच्या भावना आणि आग्रह लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 22 जानेवारीला संपूर्ण देशातील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारने याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात सोहळ्यात सामील होण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सरकारच्या या निर्णयानुसार 22 जानेवारीला (Ram Mandir) देशातील केंद्रीय कार्यालये, केंद्रीय संस्था, केंद्रीय औद्योगिक संस्था अर्धा दिवस म्हणजेच दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद असणार आहेत. श्री राम मंदिरात रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आता कर्मचाऱ्यांना देखील सहभागी होता येणार आहे. त्यामुळे सर्वत्रच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुपारी साडे बारा वाजता मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी संबोधन करणार आहेत. सोहळ्याला आठ हजार निमंत्रित उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी आता पासूनच भव्य तयारी केली जात आहे. या दिवशी देशभरातील विविध शास्त्रीय वाद्यांचे वादन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागांतील संगीतकारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या देशातील वातावरण धार्मिक झाले आहे.

अयोध्येमध्ये झाली अनेक कार्यक्रमांची सुरुवात

अभिषेक सोहळ्यापूर्वी (Ram Mandir) मंगळवारपासून अयोध्येमध्ये अनेक विधी सुरू झाल्या आहेत. हे कार्यक्रम 21 जानेवारीपर्यंत चालणार आहेत. शरयू नदीच्या काठावर नुकतेच कलश पूजन करण्यात आले, यामध्ये शेकडो नागरिकांचा देखील सहभाग होता. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे मुख्य शिल्पकार पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोहळ्याचे प्रमुख यजमान असणार असल्याचे सांगितले आहे.

या सोहळ्यासाठी बॉलीवुडपासून ते क्रिकेटजगतातील अनेक दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांनी हा सोहळा ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. राम मंदिर (Ram Mandir) हे देशासाठी गौरवाचे ठरणार आहे. त्यामुळे सर्वच जन या भव्य सोहळ्याची आतुरतेने वाट पहात आहेत.

News Title- Ram Mandir half day leave for central govt offices

महत्वाच्या बातम्या- 

Jaya Bachchan | …काहींना लाज सुद्धा वाटत नाही!; जया बच्चन आणि ऐश्वर्या रायबद्दल आता नवीनच चर्चा सुरु

चक्क खासदारानं मॅालमधून चोरले कपडे, पाहा कसा CCTV मध्ये कैद झाला कपडेचोर खासदार

Vivah Muhurta 2024 l लग्नाळुंसाठी नवं वर्ष जाणार आनंदाचं! जाणून घ्या 2024 मधील विवाह मुहूर्त

IND vs AFG Super Over Match l Rohit Sharma पहिल्या सुपर ओव्हरमध्ये ‘आऊट’, तरी दुसऱ्या सुपर ओव्हरला बॅटिंगला कसा उतरला?, काय सांगतो नियम

Best tourist destinations near Pune | पुण्यापासून 150 किमीच्या आत असलेल्या या पर्यटनस्थळांना आवर्जून भेट द्या