Vivah Muhurta 2024 l लग्नाळू मंडळी अगदी आतुरतेने वाट पाहत असलेल्या लग्नसराईच्या हंगामाला आजपासून सुरवात होत आहे. त्यामुळे लग्नासाठी योग्य मुहूर्त आणि वेळ पाहत असतात. सध्या लग्न हे धुमधडाक्यात करण्याचा ट्रेंड देखील सुरु आहे. आकर्षक डेकोरेशनपासून ते फटाक्यांच्या आतिषबाजीपर्यंत सर्व नियोजन पद्धतशीरपणे (Vivah Muhurta 2024) ठरलेले असतात. अशातच आता लग्नाळुंसाठी एक आनंदाची बातमी आहे.
यंदाच्या वर्षी लग्नसराईचा मोठा हंगाम (Vivah Muhurta 2024) :
यंदाच्या वर्षी लग्नसराईचा हंगाम खूपच मोठा आहे. त्यामुळे तुम्हाला व तुमच्या नातेवाइकांनामध्ये कोणाचे लग्न असेल तर जानेवारी ते एप्रिल या कालावधीत लग्नाची तारीख आणि शुभ मुहूर्त किती आहे हे आज आपण जाणून घेऊयात…
शुभमुहूर्तावर लग्न केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते, असे मानले जाते. त्यामुळे यावर्षी 16 जानेवारी ते 6 मार्चपर्यंत अनेक मोठे शुभ मुहूर्त आहेत. यानंतर नोव्हेंबरमध्ये देखील लग्नाचे मोठे शुभ मुहूर्त असणार आहेत. त्यामुळे या वर्षात कोणत्या महिन्यात किती शुभ मुहूर्त आहे ते सविस्तर पाहुयात…
Vivah Muhurta 2024 l असे असतील यंदाच्या वर्षातील शुभ मुहूर्त :
जानेवारी : या महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यात वैवाहिक जीवनाला सुरवात करण्यासाठी शुभ मुहूर्त हा 16 जानेवारीपासून सुरू झाला आहे. या महिन्यात लग्नसाठी शुभ मुहूर्त हे 16, 17, 20, 21, 22, 27, 28, 30, आणि 31 या दिवशी असणार आहे.
फेब्रुवारी : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना असल्याचे म्हणले जाते. या महिन्यात तुम्ही तुमच्या संसाराला सुरवात करणार असाल तर तुम्ही 4, 6, 7, 8, 12, 13, 17, 24, 25, 26 व 29 या दिवशी थाटमाट लग्न करू शकता.
मार्च : मार्च महिन्यात थाटामाटात लग्न सोहळा करायचा असेल तर तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11 आणि 12 या दिवशी करू शकता. या महिन्यात लग्नासाठी एकूण 10 दिवस शुभ दिवस आहेत.
एप्रिल : उन्हाळ्यात लग्न करायचं असं काही जोडप्याचं म्हणणं असत. जर तुम्हालाही उन्हाळ्यात लग्न करायचं असेल तर तुम्ही उन्हाळ्यातील 18, 19, 20, 21 व 22 या दिवशी लग्नसोहळा करू शकता.
नोव्हेंबर : थंडीच्या काळात डेस्टिनेशन वेडिंग करायचं काहींचं स्वप्न असत. जर तुम्ही देखील असा विचार करत असाल तर तुम्ही 12, 13, 16, 17, 18, 22, 23, 25, 26, 28, 29. यापैकी कोणत्याही दिवशी वेडिंग करू शकता.
डिसेंबर : संसार सुखाचा होण्यासाठी शुभ मुहूर्तवर लग्न करायला हवे असे म्हणतात. तर तुम्हालाही शुभ मूहूर्तावर लागण करायचे असल्यास 4, 5, 9, 10, 14 व 15 या शुभ तारखा आहेत. त्यामुळे तुम्ही यादिवशी सुखी संसाराला सुरवात करू शकता.
News Title : Vivah Muhurta 2024
महत्त्वाच्या बातम्या-
Virat Kohli l शून्यावर आऊट झाला विराट कोहली, मात्र कोहली नसता तर भारत हरला असता, कारण…
SIP Tips to Invest l SIP मध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? मग त्याआधी या गोष्टी लक्षात घ्या