SIP Tips to Invest l SIP मध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? मग त्याआधी या गोष्टी लक्षात घ्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

SIP Tips to Invest l गुंतवणुकीसाठी आजही अनेक लोक बँक FD तसंच PPFला सर्वात उत्तम पर्याय मानतात. कारण यामध्ये कोणतीही जोखिम नसते असे सांगतले जाते. पण मागील दोन ते तीन वर्षांपासून अनेक लोक जास्त रिटर्न मिळावे यासाठी SIPमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील वर्षी म्हणजेच जून 2023 मध्ये भारतीय बाजारातील SIP च्या माध्यमातून भारतीयांकडून तब्बल 14,734 कोटींहून अधिक (SIP Tips to Invest) रुपयांची गुंतवणूक आली.

SIP मध्ये गुंतवणूक करण्याआधी कोणते 5 मंत्र लक्षात घ्यावे? :

सातत्य (Consistency) :

SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे सातत्य आवश्यक आहे. SIP मध्ये शॉर्ट टर्म गुंतवणूक करतांना चढउतार लक्षात न घेता नियमित गुंतवणूक करणे चालू ठेवले पाहिजे.

लॉग टर्म (Long-Term) : 

SIP मध्ये गुंतवणूक करतांना नेहमी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असते. असे केल्यास पावर ऑफ कम्‍पाउंडिंगचा गुंतवणूकदाराला फायदा होतो. तसेच, तुम्ही मार्केटमधील वॉलेटिलिटीपासून बचाव करु शकता.

वेगळेपणा (Diversification) : 

बोलायचे झाले तर SIP गुंतवणुकीमध्ये वेगवेगळे एसेट क्लास, तसेच सेक्टर्स आणि फंड्समध्ये वाटप करण्यात येते. तसेच हे जोखीम कमी करण्यास आणि मजबूत रिटर्न मिळण्यासाठी तुम्हाला मदत करते.

धैर्य (Patience) : 

लॉन्ग टर्मसाठी SIPमध्ये गुंतवणूक करत रहा. तसेच अश्यावेळी शॉर्ट टर्म मार्केट मूव्हमेंट किंवा बाजारातील चढउतारानुसार निर्णय घेणे शक्यतो टाळा. म्हणजेच अर्थातच तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर थोडा धीर धरा.

समीक्षा आणि जुळवून घ्या (Review and Adjust) : 

SIP Tips to Invest l ठराविक अंतराने किंवा नियमितपणे SIP गुंतवणुकीची समीक्षा करा. तसेच फंडाची कामगिरी अथवा बाजारातील बदलत्या परिस्थितीचे नेहमी निरीक्षण करा आणि स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन प्लॅन मध्ये बदल करा.

News Title : SIP Tips to Invest

महत्त्वाच्या बातम्या-

Pune News: पुण्यातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक आयुक्त नेमावा, सुनील माने यांची मागणी

Nuclear Battery Technology l ऐकावं ते नवलच!, एकदा फोन चार्ज केला की 50 वर्षे चालणार बॅटरी

Ram Mandir | 22 जानेवारीला पाच राज्यातील शाळांना सुट्टी, पाहा यादी

Central Government Alert On Cyber Crime l सरकारकडून मोठा इशारा!, विना OTP बँक अकाऊंट होतायेत खाली, चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी

Viral Video । छोट्या हत्तीवर घेऊन चाललेत मोठा हत्ती, व्हिडीओ पाहून लोक झालेत हैराण!