Central Government Alert On Cyber Crime l सरकारकडून मोठा इशारा!, विना OTP बँक अकाऊंट होतायेत खाली, चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी

Central Government Alert On Cyber Crime l दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण अगदी मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. वाढत्या गुन्ह्यांमुळे बँकिंग क्षेत्रावर देखील परिणाम होत असल्याचे दिसत आहे. हॅकर्स अगदी काही सेकंदातच नागरिकांचं बँकिंग खात रिकामं करतो. अगदी त्या नागरिकाला कोणत्याही गोष्टीची कल्पना नसताना देखील असे घडत आहे. मात्र या सगळ्याला आता आळा बसणार आहे.

केंद्र सरकारने सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी उचललं मोठं पाऊल :

केंद्र सरकारने सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. सरकारच्या गृह कार्यालयाने
नागरिकांची अतिदक्षता म्हणून एक अलर्ट जारी केला आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, नागरिकांनी ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षित राहावे. तसेच जारी केलेल्या अलर्टमध्ये लोकांविरुद्ध गुन्हे कसे केले जातात हे सांगण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने अलर्ट जारी करून घोटाळ्याची एक नवीन पद्धत शोधून काढली असल्याची माहिती दिली आहे. हॅकर्स ऑनलाईन फसवणूक करताना बँक धारकाला कोणताही OTP विचारत नाही. अगदी काही सेकंदात बँक खाते रिकामे करत आहे. या सगळ्यामुळे लोकांना फसवणूक झाल्याचे देखील समजत नाही.

Central Government Alert On Cyber Crime l हॅकर्सने फसवणूक करण्यासाठी सुरु केला एक नवा फंडा :

गृहखात्याने जारी केलेल्या अलर्टमध्ये असे सांगितले आहे की, हॅकर्सकडून एक नंबर दिला जातो. बँक खाते धारकांनी दिलेल्या नंबरवर डायल करा अन्यथा तुमचा फोन बंद होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. मात्र अनेक लोक या भूलथापांना बळी पडतात आणि दिलेला नंबर डायल करतात.

मात्र जर तुम्ही असे केल्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. हा सर्व प्रकार हॅकर्सने फसवणूक करण्यासाठी (Central Government Alert On Cyber Crime) तयार केलेली अनोखी पद्धत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हॅकर्स तुम्हाला *401#99963….45 हा नंबर डायल करण्यास सांगतात. त्यामुळे अतिदक्षता घ्या.

या सर्व प्रकारापासून असा करा बचाव :

जर तुम्हाला अशा घोटाळ्यांपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर तुम्ही सर्वप्रथमअशा कोणत्याही कॉलला उत्तर देऊ नये. कारण फोन किंवा सिम कार्ड हॅक (Central Government Alert On Cyber Crime) झाल्यास कॉलद्वारे कोणतीही माहिती दिली जात नाही. अनेकवेळा हॅकर्स मोबाईल वापरकर्त्यांवर दबाव आणला जातो आणि त्यांच्या फोनवर अॅप्स देखील डाउनलोड केले जातात. मात्र हे एक VPN अॅप आहे, जे तुमच्या फोनमधील सर्व डेटा चोरते, त्यामुळे तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे.

News Title- Central Government Alert On Cyber Crime

महत्त्वाच्या बातम्या –

Female Teacher Sexually Abused 15 Year Old Student l 15 वर्षाच्या मुलासोबत शिक्षिकेनं ठेवले शारीरिक संबंध, असले मेसेज समोर आल्याने उडाली खळबळ

Rohit Sharma | आधीच 2 वेळा शून्यावर आऊट झालोय, त्यात तू… अंपायरवर भडकला रोहित शर्मा

Rohit Sharma | मी एकटाच पुरेसा आहे! अफगाणिस्ताननं अनुभवलं रोहित शर्मा नावाचं वादळ!

IND vs AFG | बलाढ्य टीम इंडियाला अफगाणिस्तानने फोडला घाम, डबल सुपर ओव्हरपर्यंत नेला सामना

Video | अबब! रोहित-रिंकू अक्षरशः तुटून पडले, शेवटच्या ओव्हरमध्ये रेकॅार्डब्रेक धावांचा पाऊस