Rohit Sharma | आधीच 2 वेळा शून्यावर आऊट झालोय, त्यात तू… अंपायरवर भडकला रोहित शर्मा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ट्वेंटी-20 मालिका 3-0 अशी संपली. यजमान भारताने पाहुण्या अफगाणिस्तानचा तिन्ही सामन्यांमध्ये पराभव केला. सलामीच्या सामन्यात मोहाली येथे शुभमन गिलच्या चुकीमुळे भारतीय कर्णधार रोहित शर्माला शून्यावर धावबाद व्हावे लागले होते. इंदूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात देखील रोहित शून्यावर तंबूत परतला होता. तेव्हा एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या हिटमॅनचा त्रिफळा उडाला.

या मालिकेतून रोहितने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि टीम इंडियानेही विजयाची नोंद केली पण पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहितचे फलंदाजीत कोणतेही योगदान नव्हते. दोन्ही सामन्यात तो खातेही न उघडता बाद झाला होता. अशा स्थितीत तिसर्‍या ट्वेंटी-20 सामन्यात सर्वांच्या नजरा त्याच्याकडे लागल्या होत्या. पण, अखेरच्या सामन्यात रोहितने शतक झळकावून जोरदार पुनरागमन केले. खरं तर या सामन्यात रोहितबाबत एक नाट्यमय घडामोड घडली, ज्यामुळे भारतीय कर्णधार अंपायरवर भडकला.

IND vs AFG तिसऱ्या सामन्याचा थरार

बंगळुरू येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, रोहित शर्माला पहिल्याच षटकात मोठा दिलासा मिळाला. परंतु अंपायरच्या चुकीमुळे त्याचे नुकसान झाले. झाले असे की, डावाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्मा स्ट्राईकवर आला. डावखुरा वेगवान गोलंदाज फरीद अहमदच्या चेंडूवर रोहितने लेग साईडला फ्लिक केले आणि चेंडू 4 धावांसाठी गेला.

 

मात्र, अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी त्याला लेग बाय दिला. पुढच्या दोन चेंडूंवरही रोहितला धावा मिळाल्या नाहीत. पाचव्या चेंडूवर रोहितने पुन्हा शॉट खेळला पण चेंडू पॅडला लागला आणि 4 धावांवर गेला. शेवटच्या चेंडूवरही रोहित आपले खाते उघडू शकला नाही. अशाप्रकारे 5 चेंडूत रोहितची धावसंख्या केवळ 0 होती. त्यानंतर पुढच्या षटकात देखील असेच काहीसे घडले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Rohit Sharma ने अंपायरला सांगितली चूक

दरम्यान, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यशस्वी जैस्वालने 1 धाव घेतली आणि रोहित स्ट्राईकवर आला. खेळपट्टीवर येताच रोहितने अंपायर वीरेंद्र शर्मा यांच्याकडे नाराजी व्यक्त करत त्यांची चूक निदर्शनास आणून दिली. रोहित म्हणाला, वीरू, तू मला पहिल्या चेंडूवर थाय पॅड दिला होतास का? बॅट लागली होती भाई. एक तर मी आधीच दोनवेळा शून्यावर बाद आहे.

अखेर या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रोहितने 1 धाव घेत आपले खाते उघडले आणि सलग तीनवेळा शून्यावर बाद होण्यापासून स्वत:ला वाचवले. एकंदरीत रोहितला पहिली धाव घेण्यासाठी 7 चेंडूंची वाट पाहावी लागली. मात्र, यावेळी टीम इंडियाचा ‘किंग कोहली’ पहिल्याच चेंडूवर बाद झाला. बंगळुरू येथील आयपीएलच्या घरच्या मैदानावर खेळणारा विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

News Title- Rohit Sharma was seen angry with the umpire
महत्त्वाच्या बातम्या –

Rohit Sharma | मी एकटाच पुरेसा आहे! अफगाणिस्ताननं अनुभवलं रोहित शर्मा नावाचं वादळ!

IND vs AFG | बलाढ्य टीम इंडियाला अफगाणिस्तानने फोडला घाम, डबल सुपर ओव्हरपर्यंत नेला सामना

Video | अबब! रोहित-रिंकू अक्षरशः तुटून पडले, शेवटच्या ओव्हरमध्ये रेकॅार्डब्रेक धावांचा पाऊस

Benefits of clove | सर्दी-खोकल्याच्या त्रासाने त्रस्त आहात?, मग करा ‘हा’ उपाय

Rashmika Mandanna च्या चाहत्यांना मोठा धक्का; लग्नाबाबत घेतला मोठा निर्णय?