Video | अबब! रोहित-रिंकू अक्षरशः तुटून पडले, शेवटच्या ओव्हरमध्ये रेकॅार्डब्रेक धावांचा पाऊस

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Video | अफगाणिस्तानविरूद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी जबरदस्त खेळी केली. दोन्ही खेळाडूंनी केवळ विश्वविक्रमी भागीदारीच केली नाही तर एकाच षटकात मिळून 36 धावा कुटल्या. अखेरच्या षटकात भारताने तब्बल 36 धावा जोडल्या अन् तेव्हापासूनच सामन्यातील नाट्यमय घडामोडींना सुरूवात झाली. रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी बंगळुरूच्या त्याच खेळपट्टीवर इतिहास रचला, जिथे पहिल्याच चेंडूवर विराट कोहली आणि संजू सॅमसनसारखे खेळाडू बाद झाले. इथे यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांनाही फलंदाजी करता आली नाही.

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-20 मध्ये रोहित-रिंकूने गोलंदाजांवर असा कहर केला की क्रिकेट विश्व पाहतच राहिले. या सामन्यात रोहित शर्माने नाबाद 121 धावा केल्या तर रिंकू सिंगनेही केवळ 39 चेंडूत नाबाद 69 धावांची खेळी केली. भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात या दोन फलंदाजांनी सर्वात तुफानी फलंदाजी केली ज्यामध्ये रिंकू-रोहितने मिळून 6 चेंडूत 36 धावा केल्या.

IND vs AFG सामन्याचा थरार

अफगाणिस्तानचा मध्यमगती गोलंदाज करीम जनतच्या षटकात रोहित शर्मा आणि रिंकू सिंगने 36 धावा दिल्या. अफगाणिस्तानकडून विसावे षटक करीम टाकत होता. करीमच्या या षटकात रोहितने 2 षटकार आणि रिंकू सिंगने 3 षटकार ठोकले. शेवटच्या षटकात रिंकू आणि रोहितने आपल्या संघासाठी 36 धावा जोडल्या.

20 व्या षटकातील थरार

पहिला चेंडू – रोहित शर्माने चौकार ठोकला.
दुसरा चेंडू – नो बॉल अन् रोहितचा गगनचुंबी षटकार
दुसरा चेंडू – रोहितचा आक्रमक पवित्रा कायम. यावेळीही टीम इंडियाच्या खात्यात केवळ 6 धावा जमा झाल्या.
तिसरा चेंडू – या चेंडूवर रोहितने थर्ड मॅनच्या दिशेने एक शॉट खेळला आणि एक धाव घेतली.
चौथा चेंडू – रिंकू सिंग स्ट्राईकवर होता आणि जनातच्या चौथ्या चेंडूवर त्याने डीप मिडविकेटवर षटकार ठोकला.
पाचवा चेंडू – रिंकू सिंगने पुन्हा एकदा डीप मिडविकेटवर षटकार ठोकला.
सहावा चेंडू – सहावा चेंडू रिंकूच्या बॅटला स्पर्श करून 6 धावांवर डीप स्क्वेअर लेगवर गेला.

Video पाहा

 

अशाप्रकारे सुरूवातील अवघ्या 22 धावांत 4 विकेट गमावणाऱ्या टीम इंडियाने 212 धावांपर्यंत मजल मारली. रोहित आणि रिंकू सिंग यांनी पाचव्या बळीसाठी 190 धावांची भागीदारी नोंदवली, जी ट्वेंटी-20 क्रिकेटमधील एक विक्रम आहे. त्याचबरोबर भारतासाठी कोणत्याही ट्वेंटी-20 सामन्यातील ही सर्वात मोठी भागीदारी आहे.

अखेर Team India चा विजय…

भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 बाद 214 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने देखील कडवे आव्हान दिले आणि 20 षटकांत 6 बाद 212 धावा करून सामना बरोबरीत संपवला. मग सुपर ओव्हर झाली, ज्यात प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या अफगाणिस्तानने 16 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल फलंदाजीला आले पण टीम इंडियाला देखील केवळ 16 धावा करता आल्या आणि सुपर ओव्हर देखील बरोबरीत संपली. पुन्हा एक सुपर ओव्हर खेळवली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने प्रथम फलंदाजी केली अन् 12 धावांचे लक्ष्य ठेवले. पण, रवी बिश्नोईने अफगाणिस्तानचे 3 चेंडूत 2 बळी घेतले आणि भारताने 10 धावांनी सामना जिंकला.

News Title- Rohit Sharma and Rinku Singh scored 36 runs in the last over
महत्त्वाच्या बातम्या –

Benefits of clove | सर्दी-खोकल्याच्या त्रासाने त्रस्त आहात?, मग करा ‘हा’ उपाय

Rashmika Mandanna च्या चाहत्यांना मोठा धक्का; लग्नाबाबत घेतला मोठा निर्णय?

Ram Mandir | रामनगरीला आनंद गगनात मावेना; अयोध्येत परतले स्वयं ‘राम-सीता’ आणि लक्ष्मण

प्राणप्रतिष्ठापणेपूर्वी मोदींना खुणावतेय ‘यांची’ कमी; आठवणीने झाले व्याकुळ

धर्मेंद्र-हेमा मालिनीच्या लेकीच्या आयुष्यात मोठं वादळ; अफेअरबद्दल धक्कादायक गोष्टी आल्या समोर