Ram Mandir | रामनगरीला आनंद गगनात मावेना; अयोध्येत परतले स्वयं ‘राम-सीता’ आणि लक्ष्मण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या असलेल्या अयोध्येत भव्य राम मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राम आपल्या भूमीत परतत असल्याने सर्वांनाच आनंद झाला आहे. येत्या 22 जानेवारीला मंदिर उद्घाटनाचा (Ram Mandir) भव्य सोहळा होणार आहे. या सोहळ्यात अनेक दिग्गज उपस्थिती लावणार आहे. मात्र, त्यापुर्वीच राम नगरी आनंदाने दुमदुमली आहे.

अयोध्येत स्वयं ‘राम-सीता’ आणि लक्ष्मण परतले आहेत. अर्थातच ‘रामायण’ या मालिकेतील रामाची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) , लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लहरी (Sunil Lahiri) आणि सीताची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया (Deepika Chikhalia) यांनी एकत्र अयोध्येला भेट दिली. ‘हमारे राम आएंगे’ या आगामी अल्बम मध्ये ते दिसणार आहेत. त्याच्याच शूटिंग साठी या तिन्ही कलाकारांनी अयोध्येला भेट दिली.

‘रामायण’च्या कास्टचा अयोध्या दौरा

अरुण गोविल, सुनील लहरी आणि दीपिका चिखलिया यांना एकत्र बघून ते अगदी ‘रामायण’ मध्ये जसे दिसत होते तसेच दिसून आले. त्यांना बघून नागरिकांनी एकच गर्दी केली. बऱ्याच लोकांनी त्यांच्यासोबत फोटो देखील काढले. हे तिन्ही कलाकार चालत असताना जणू स्वयं राम-सीता आणि लक्ष्मणच चालत आहेत की, काय असा भास लोकांना झाला.

‘रामायण’ मालिकेपासून या तिन्ही कलाकारांना त्याच रूपात पहिले जाते. लोक अजूनही त्यांना देवासारखे पूजतात. त्यांच्याप्रति आदर भाव प्रकट करतात. यावेळी देखील लोकांनी त्यांच्याप्रती आस्था दाखवली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘हमारे राम आएंगे’ या गाण्याला सोनू निगमने आवाज दिला आहे. याची शूटिंग गुप्तार घाट, हनुमानगढी आणि लता चौक येथे करण्यात आली. या पार्श्वभूमीवरच रामायण मधील कास्टने अयोध्या दौरा केला. याचे फोटो आणि व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत.

राम-लक्ष्मण झाले भावुक

अरुण गोविल यांनी म्हटले की, “अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir ) आपले राष्ट्र मंदिर म्हणून बघितले जाईल. कित्येक वर्षांपासून जी संस्कृती धुळखात पडली होती, ती पुन्हा एकदा प्रकाशमयी होणार आहे. हे मंदिर आपल्या संस्कृतीला अजून मजबूत करेल. हे मंदिर संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे ठरेल. आपल्या देशाचा गौरव आणि अभिमान ठरणारे हे मंदिर भविष्यात मोठी विरासत बनेल.”

तर लक्ष्मणची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी म्हणाले की, “राम मंदिर (Ram Mandir ) उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणे हे माझे भाग्य आहे. देशात अतिशय धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण जगाला सकारात्मकता प्रदान करेल.” अशी प्रतिक्रिया सुनील लहरी यांनी दिली.

News Title- Ram Mandir Ramayana cast Ayodhya tour

महत्वाच्या बातम्या

Jaya Bachchan l Amitabh Bacchan नव्हे, मला हा हिरो आवडायचा!; जया बच्चन यांचा सर्वात मोठा खुलासा

Gold Rate Today l सोनं झालं स्वस्त! पाहा आजचे दर

Bank Holidays l फेब्रुवारी महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर

Prdhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana l या योजनेत अवघे 330 रुपये गुंतवा अन् निश्चिन्त राहा

PAK vs NZ | 16 सिक्स अन् 5 चौकार! पाकिस्तानची लाज गेली; न्यूझीलंडच्या खेळाडूचं झंझावाती शतक