Gold Rate Today l जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते करण्यापूर्वी तुम्हाला सोने- चांदीचे दर माहित असणे गरजेचे आहे. कारण सोन्या-चांदीच्या किंमती (Gold Rate Today) दररोज बदलत असतात. अशातच आता लग्न सराई देखील चालू आहे. त्यामुळे नागरिक सोनं खरेदी करायला जास्त प्राधान्य देत असतात.
गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 17 जानेवारी 2024 रोजी बुधवारी 22 कॅरेट व 24 कॅरेट सोन्याचा भाव जाहीर केला आहे. मात्र आज सोने व चांदीचे (Gold Rate Today) दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर तुम्हीही सोने चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
Gold Rate Today l तर जाणून घेऊयात आजच्या सोन्याचे दर :
आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 5,770 रुपये आहे. तर हेच दर काल (16 जानेवारी) 5,805 रुपये होते. तसेच आजचे 8 ग्रॅम सोन्याचे दर 46,160 रुपये आहे तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,700 रुपये आहे. कालच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,050 रुपये होता. म्हणजेच कालच्या तुलनेत सोनं 350 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
चांदीच्या दरातही घसरण :
आज सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. अशातच सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदीच्या दरात 300 रुपये किलोने घसरण झाली आहे. आज मुंबई शहरामध्ये चांदीचा दर 76,300 रुपये प्रति किलो आहे. तर हाच दर काल मंगळवारी एक किलो चांदीचा भाव 76,800 रुपये होता.
Gold Rate Today l देशातील प्रमुख मेट्रो शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर पुढीलप्रमाणे :
चेन्नई : 58,100
मुंबई : 57,700
दिल्ली : 57,850
पुणे : 57,700
अहमदाबाद : 57,750
महत्त्वाच्या बातम्या –
Prdhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana l या योजनेत अवघे 330 रुपये गुंतवा अन् निश्चिन्त राहा
PAK vs NZ | 16 सिक्स अन् 5 चौकार! पाकिस्तानची लाज गेली; न्यूझीलंडच्या खेळाडूचं झंझावाती शतक