Raveena Tandon l रवीना टंडन ही 90 च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीना वयाच्या 16 व्या वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारच्या ‘कर्मा कॉलिंग’ या मालिकेत दिसणार आहे. मात्र रवीनाने एका मुलाखतीत (Raveena Tandon) जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
जुन्या काळात कलाकारांमध्ये निर्माण झालेले बंध अजूनही कायम:
रवीनाने मुलाखतीत सांगतले की, 90 च्या दशकात फोन, सोशल मीडिया आणि लक्झरी व्हॅनसारख्या गोष्टी नव्हत्या. अशा परिस्थितीत सेलेब्सना त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सर्व (Raveena Tandon) काही माहित होते. त्या काळात कलाकारांमध्ये निर्माण झालेले बंध अजूनही कायम असल्याचे रवीना म्हणाली आहे.
तसेच त्यावेळी मनोरंजनाचे दुसरे कोणतेही साधन नव्हते. तेव्हा स्मार्टफोन्स नव्हते, लक्झरी व्हॅन्स नव्हत्या. आता शॉट संपल्याबरोबर लोक फोन वापरायला लागतात किंवा व्हॅनमध्ये जातात. त्यावेळी आमच्याकडे खुर्च्या जोडून बसण्याशिवाय पर्याय देखील नव्हता. आपण वाळवंटाच्या वाळूत बसलो किंवा जंगलाच्या मध्यभागी शूटिंग करत असलो तरीही. तुमच्याकडे एकत्र बसण्याशिवाय पर्याय नव्हता अशा कठीण शब्दांत रवीनाने जुन्या गोष्टी सांगितल्या आहेत.
आम्हाला प्रत्येक कलाकाराच्या जीवनकथा माहित होत्या (Raveena Tandon) :
याशिवाय रविनाने असा देखील खुलासा केला आहे की, आम्हाला प्रत्येकाच्या जीवनकथा माहित होत्या. आपण कोणत्या हिरोसोबत काम करत आहोत, त्याचे कोणासोबत अफेअर आहे. कोणाच्या बायकोने कोणाला मारले? आम्हाला एकमेकांबद्दल सर्व काही माहित होते. मात्र तो एक बंध आहे. 90 च्या दशकात जे एकत्र होते ते आजही एकत्र आहे. आम्ही सर्व मित्रांसोबत उभे आहोत. आम्ही एकमेकांना प्रोत्साहन देतो. माधुरी, मी, नीलम, सोनाली किंवा शिल्पा आम्ही एकमेकींना कायमच प्रोत्साहन देतो.
Raveena Tandon l रवीना टंडन ‘कर्मा कॉलिंग’ या मालिकेत दिसणार मुख्य भूमिकेत :
रवीना टंडनने 1991 मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून (Raveena Tandon) आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तिने ‘मोहरा’, ‘अंदाज अपना अपना’, ‘दमन’, ‘शूल’ आणि ‘दुल्हे राजा’ यांसारख्या चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
रवीनाच्या हिट चित्रपटांनी तिला 90 च्या दशकातील स्टार बनवले. इंडस्ट्रीतील इतर अभिनेत्री आणि अभिनेत्यांशीही तिची चांगली मैत्री होती. आता रवीना टंडन ‘कर्मा कॉलिंग’ या मालिकेत दिसणार आहे. 26 जानेवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Madhuri Dixit तेव्हा सेटवर रडली होता, तो सीन करायला… कलाकाराचा खळबळजनक दावा
Jawa 350 Launched in India l रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ला टक्करं देण्यासाठी Jawa 350 बाईक लाँच
BCCIचा मोठा निर्णय! शिखर धवनसह 4 बड्या खेळाडूंना धक्का, तर 2 नवोदित खेळाडूंना खास सरप्राईज!
Shaktiman फिल्मसाठी आता वाट पाहावी लागणार?, मोठी माहिती आली समोर