Madhuri Dixit तेव्हा सेटवर रडली होती, तो सीन करायला… कलाकाराचा खळबळजनक दावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Madhuri Dixit l कित्येकांच्या मनावर राज्य करणारा रणजीत हा एक भारतीय अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक आहे. रणजित बॉलीवूडमधील त्याच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. त्यानी 200 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत. तसेच अभिनेता रणजित त्याच्या करिअरमध्ये पाहिलेल्या कठीण प्रसंगाबद्दल नेहमीच बोलत असतो. रणजीत त्याच्या काळातील बॉलिवूडमधील सर्वात मोठा खलनायक होता.

खलनायकाच्या भूमिकेमुळे रणजितच्या ऑफस्क्रीन आयुष्यावर झाला परिणाम :

अशातच आता रणजीतने ऑनस्क्रीन घटना शेअर केली आहे. ऑनस्क्रीन इमेजचा त्याच्या ऑफस्क्रीन आयुष्यावरही मोठा प्रभाव पडला असल्याचे त्यानी सांगितले आहे. रणजित एक खलनायकाची भूमिका साकारत असल्याने त्याला स्त्रिया त्याला घाबरत होत्या व अभिनेत्री त्याच्यासोबत काम करायला किंवा त्याला भेटायलाही टाळत होत्या. अनेकवेळा अभिनेत्रींनी त्याच्यासोबत काम करण्यास नकार देखील दिला आहे. असाच एक प्रसंग ‘प्रेम के वक्त’ चित्रपटाच्या वेळी झाला आहे.

Madhuri Dixit l या कारणामुळे माधुरी ढसाढसा रडली :

रणजीतने सांगितल्याप्रमाणे. अभिनेत्री माधुरी दीक्षितने ‘प्रेम प्रतिज्ञा’ चित्रपटात त्याच्यासोबत काम करण्यास जवळपास नकार दिला होता. मात्र रणजीतला याबद्दल फारशी माहिती नव्हती. याबद्दलची माहिती अजय देवगणचे वडील आणि अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांनी रणजीतला याबाबतची कल्पना दिली होती. मात्र अभिनेत्री माधुरीने रणजीत सोबत सिन करण्यास नकार दिला होता. त्यावेळी माधुरी चक्क मेकअप करताना रडू लागली.

यानंतर अभिनेता पुढे म्हणाला, ‘मला कळत नव्हते काय होत आहे. मी फक्त दोन तास सेटवर यायचो. ती एका गरीब माणसाच्या मुलीची भूमिका करत होती, मला तिचे शोषण करावे लागले. फाईट मास्टर वीरूने सांगितले होते की तो नॉनस्टॉप सिन असणार आहे. मात्र अगदी काही वेळातच हा सिन पूर्ण झाला.

Madhuri Dixit l मात्र सीन पूर्ण झाल्यावर माझ्यामुळे कुणालाही काही अडचण आली नाही. सहसा लोक मला विचारायचे की तो सिन कसा आहे. मात्र यावेळी सर्वांनी माधुरीला घेरले. ती म्हणाली की रणजीतने तिला स्पर्श केला हे तिला कळले देखील नाही. ही माझ्यासाठी प्रशंसा होती. मी प्रत्येक स्त्रीचा आदर करतो, मग मी त्यांना ओळखत असो वा नसो असं रणजीतने मुलाखतीत सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Jawa 350 Launched in India l रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ला टक्करं देण्यासाठी Jawa 350 बाईक लाँच

BCCIचा मोठा निर्णय! शिखर धवनसह 4 बड्या खेळाडूंना धक्का, तर 2 नवोदित खेळाडूंना खास सरप्राईज!

Shaktiman फिल्मसाठी आता वाट पाहावी लागणार?, मोठी माहिती आली समोर

T20 World Cup खेळणार रिषभ पंत, करोडोंच्या मशीनवर असा सुरु आहे सराव

Salman Khan नं स्वतःच्या पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; शाहरुख खानचा झाला मोठा फायदा!