Shaktiman फिल्मसाठी आता वाट पाहावी लागणार?, मोठी माहिती आली समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shaktiman | बहुचर्चित असलेल्या शक्तीमान चित्रप्रटाची प्रतीक्षा लांबणार असल्याचे कळते. शक्तीमानची भूमिका पहिल्यांदा मुकेश खन्ना यांनी साकारली होती. 1997 मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ या शोमध्ये ते एक-दोन नव्हे तर आठ वर्षे या भूमिकेत ते दिसले होते. शक्तीमान हा पहिला सुपरहिरो मानला जातो. शक्तीमानची लोकप्रियता पाहता त्यावर चित्रपट बनवण्याची चर्चा होती. सुरुवातीला 200 ते 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पण, रिपोर्ट्सनुसार शक्तीमान हा चित्रपट तूर्त थांबवण्यात आला आहे. एकूणच शक्तीमान चित्रप्रटाची प्रतीक्षा लांबणार आहे. शक्तीमान हे एक असे पात्र होते ज्याला लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि युवा वर्गही जाणून आहे. हे पात्रही सर्वांना आवडते. त्यामुळे यावर चित्रपट बनवण्याचीही चर्चा होती. यामध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत होता.

शक्तीमान बिग बजेट फिल्म

शक्तीमान या चित्रपटासाठी मोठ्या बजेटची घोषणा देखील करण्यात आली होती. पण नंतर बातमी आली की चित्रपट बंद झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया यामागील नेमके सत्य काय आहे. ‘शक्तिमान’ चित्रपट बनवण्याची तयारी सुरू होती. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असणार हे देखील ठरले होते. मात्र बिग बजेट फिल्मला उशीर होत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. आता Lets Cinema ने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे.

लेट्स सिनेमाने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चित्रपटाचे बिग बजेट. मोठे बजेट असल्यामुळे तूर्तास तरी चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. रणवीर सिंग, बेसिल जोसेफ आणि सोनी पिक्चर्स यांनी त्यांचा ‘शक्तिमान’ हा प्रोजेक्ट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. स्क्रिप्टनुसार चित्रपटाचे बजेट जवळपास 550 कोटींच्या घरात पोहोचले आहे. सध्याच्या बाजारपेठेनुसार इतका पैसा खर्च करणे योग्य नाही, असे सोनी पिक्चर्सला वाटते.

Shaktiman साठी वाट पाहावी लागणार?

दरम्यान, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र चित्रपट रखडल्याच्या बातमीने चित्रपटाची वाट पाहणारे चाहते निराश झाले आहेत. त्याच वेळी काही लोक असेही म्हणतात की, चित्रपट बनल्यानंतर अपेक्षेप्रमाणे बनला नसता तर वाईट वाटले असते, म्हणून तो आधी रोखला गेला हे चांगले आहे.

एकूणच चित्रपटाच्या होल्डवर चाहत्यांकडून दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. विशेष बाब म्हणजे ही बातमी सोनी इंडियाचे महाव्यवस्थापक लाडा सिंग यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी ही बातमी पसरवणार्‍या पोर्टलला फटकारले आणि शेवटी माहिती दिली की चित्रपट होल्डवर ठेवलेला नाही. तो चित्रपट तयार होत आहे. लवकरच याची माहिती दिली जाईल.

News Title- A major information has come out about the movie Shaktiman
महत्त्वाच्या बातम्या –

T20 World Cup खेळणार रिषभ पंत, करोडोंच्या मशीनवर असा सुरु आहे सराव

Salman Khan नं स्वतःच्या पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; शाहरुख खानचा झाला मोठा फायदा!

Jackie Shroff यांचं सोशल मीडियावर होतंय कौतुक, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल एक नं भिडू

Sania Mirza | ‘जी गोष्ट तुमची शांतता…’; घटस्फोटाच्या चर्चेनंतर सानियाची पोस्ट

Food Combos | अंड्यासोबत ‘या’ गोष्टी खाणं टाळा, अन्यथा होतील गंभीर परिणाम