Sania Mirza | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्यात बिनसल्याच्या चर्चा कित्येक दिवसांपासून रंगत आहेत. लवकर हे जोडपं घटस्फोट घेणार असल्याचं ही म्हटलं गेलं. अशातच सानिया मिर्झाने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.
या पोस्टमधून ती आयुष्यात खूपच डिस्टर्ब असल्याचं जाणवतं आहे. त्यामुळे लवकरच ती पती शोएबपासून कायमचं दुर होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तीने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे या चर्चांना अधिकच वेग आला आहे.
सानिया मिर्झाची पोस्ट व्हायरल
जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या हृदयातील शांतता नष्ट करते, तेव्हा ती जाऊ द्या, अशा आशयाची पोस्ट सानियाने (Sania Mirza) काही दिवसांपुर्वी केली होती. यासोबतच पांढऱ्या ड्रेसवरील दोन फोटोही तीने पोस्ट केले आहेत. या फोटो आणि कॅप्शनमुळे त्यांच्यात काही ठीक नसल्याचं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
सानियाच्या (Sania Mirza) या पोस्टनंतर ती लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटत आहेत. सानिया आणि शोएबला एक मुलगा देखील आहे. 2018 मध्ये तीने इझानला जन्म दिला. ती सोशल मिडियावर आपल्या मुलाचे अनेक फोटो पोस्ट करत असते.
शोएब आणि सानियाचे संबंध बिघडलेत?
शोएब आणि सानिया (Sania Mirza) यांचा सुखी संसार एका अभिनेत्रीमुळे बिनसल्याचं म्हटलं जात आहे. पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमर आणि शोएब यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू आहेत. हे दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं गेलं. मात्र आयशाने या अफवा फेटाळून लावल्या होत्या.
एका विवाहित पुरुषासोबत आपण कधीच नात्यात जाणार नाही, असं आयशाने म्हटलं होतं. आयेशा आणि शोएबने एकत्र फोटोशूट केलं होतं. तेव्हापासून त्यांच्याबद्दल बोलले गेले. हेच कारण शोएब आणि सानिया यांच्यात नात्याच्या आड आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र दोघांनीही घटस्फोटाबद्दल अद्याप कोणताच खुलासा केला नाहीये.
News Title- Sania Mirza post goes viral
महत्वाच्या बातम्या-
Acharya Chanakya | यशस्वी व्हायचं असेल तर ‘अशा’ लोकांपासून लांबच राहा!
Life Insurance l लाईफ इन्शुरन्स घेण्याचा विचार करताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा…
Amitabh Bachchan यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
Weather Update | थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा