Life Insurance l भारतात आजच्या काळात डझनभर जीवन विमा कंपन्या तर शेकडो लाईफ इन्शुरन्स उत्पादने आहेत. यामुळे अनेकांना नेमका कोणता लाईफ इन्शुरुस योग्य आहे हे ठरवणे कठीण होते. उत्तम लाईफ इन्शुरन्स घेण्यासाठी खालील बाबींचा विचार नक्की करा…
फसवणूक :
योग्य माहिती नसल्यामुळे लोक चुकीचा विमा खरेदी करतात किंवा एजंटवर विश्वास ठेवत त्याने सांगितलेला विमा निवडतात. मात्र, यात अनेकदा फसवणूकही होते. हे टाळण्यासाठी बाजाराचा थोडा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
तुमच्या हातात 15 दिवसांचा वेळ :
सामान्यतः लोक जीवन विमा खरेदी करण्यापूर्वी मुख्य वैशिष्ट्यांची कागदपत्रे वाचत नाहीत किवा समजून घेत नाहीत. पॉलिसी लागू झाल्यापासून 15 दिवसांमध्ये आपल्याला पॉलिसी रद्द करण्याचाही अधिकार असतो, हे अनेकांना माहिती नसते. या कालावधीत, पॉलिसीधारकाला विमा त्यांच्या गरजांसाठी योग्य नाही, असे वाटत असल्यास खरेदी केलेली पॉलिसी 15 दिवसांच्या आत रद्द करण्याचा पर्याय निवडता येतो.
कुटुंबाला माहिती द्या !
तुमच्या कुटुंबीयांना खरेदी केलेल्या पॉलिसीची संपूर्ण माहिती द्या. जेणेकरून कोणतीही घटना घडल्यास तुमच्या कुटुंबातील सदस्यांना विम्याचा लाभ घेता येईल. सर्व पॉलिसी कागदपत्रे डिजिटल आणि कागदोपत्री स्वरूपात साठवा, जेणेकरून गरजेच्या वेळी उपलब्ध होतील.
मोहात पडू नका :
तुमची वैयक्तिक माहिती अनेक विमा एजंट आणि कंपन्यांकडे असू शकते. या कंपन्या तुमच्या पॉलिसीमधील त्रुटी सांगून पॉलिसी । बदलण्याची विनंती करु शकतात आणि विविध प्रकारची प्रलोभने देऊ शकतात. मात्र पॉलिसी बदलण्याच्या भानगडीत पडू नका.
Life Insurance l विमा का आवश्यक आहे? :
जीवन विमा खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही पॉलिसी का खरेदी करत आहात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तिला किती रकमेचा विमा आवश्यक आहे. त्याची खर्चाच्या आधारे गणना करा. तो वार्षिक खर्चाच्या किमान 20 पट असावा.
महत्त्वाच्या बातम्या –
Amitabh Bachchan यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
Weather Update | थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
PM Ujjwala Yojana Online Apply 2024 l घरबसल्या मोफत गॅस सिलिंडरचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे करा अर्ज