Jackie Shroff | येत्या 22 जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिराचं उद्घाटन (inauguration of Ram Mandir ) होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गजांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यात बॉलीवूडमधील अनेक कलाकारांचाही समावेश आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांचंही नाव सामील झाले आहेत. या पार्श्वभूमीवरच जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
राम मंदिराच्या प्रांगणात जॅकी श्रॉफ साफ सफाई करताना दिसून आले. याचा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. जॅकी श्रॉफ यांचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
Jackie Shroff यांचा व्हिडीओ व्हायरल
जॅकी श्रॉफ (Jackie Shroff ) यांनी प्राचीन राम मंदिर साफ सफाई अभियानात सहभाग नोंदवला होता. मात्र हे मंदिर अयोध्येतील नाही तर मुंबईमध्ये आहे. याच मंदीराबाहेर जॅकी श्रॉफ यांना झाडू आणि पोचा मारताना पाहिले गेले. त्यांनी हातांनी मंदिराच्या शिड्या साफ केल्या. हे काम झाल्यानंतर त्यांनी परिसरातील झाडांना पाणीही घातले.
#WATCH | Maharashtra: Amruta Fadnavis wife of Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis & Bollywood actor Jackie Shroff took part in the cleanliness drive of the oldest Ram temple in Mumbai. (14.01) pic.twitter.com/mhdkzcNB5x
— ANI (@ANI) January 14, 2024
जॅकी श्रॉफ यांचा हा स्वभाव बऱ्याच जणांना भावला आहे. अगदी साध्या पोषाखात त्यांनी साफ-सफाई अभियान राबवले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. जो झिरो पासून हीरो बनला तोच स्वतःची किंमत समजू शकतो, अशी कमेंट एका चाहत्याने केली. तर एकाने म्हटलं कॅमेरासमोर आणि त्याच्या मागील सर्वांत विनम्र मनुष्य. अजून एका व्यक्तीने तर ‘1 च नंबर बिड़ू’ असं म्हटलं. अशा कौतुकाच्या प्रतिक्रिया जॅकी श्रॉफ यांच्या व्हिडीओवर उमटत आहेत.
अनेक सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत जॅकी श्रॉफ
अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff ) अनेक सामाजिक कार्यात सहभागी असतात. त्यांनी अनेक गरजू व्यक्तींना मदत केली आहे. अनेक गरजूंच्या उपचारासाठी तसेच शिक्षणासाठी ते फंड देत असतात. त्यांचा एक ऑर्गैनिक फार्म देखील आहे. ज्यात त्यांनी अनेक ऑर्गैनिक झाडे लावली आहेत.
निसर्गाशी जवळ राहणारे जॅकी श्रॉफ यांच्या सोशल वर्कबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही. मात्र, आपले हे काम ते सतत चालू ठेवतात. आता या व्हिडीओमुळे त्यांचं कौतुक होत आहे. जॅकी श्रॉफ चित्रपटातच नाही तर, रिअल लाईफमध्ये देखील हीरो असल्याचं म्हटलं जात आहे.
News Title- Jackie Shroff is being praised on social media
महत्वाच्या बातम्या-
Amitabh Bachchan यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
Weather Update | थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
PM Ujjwala Yojana Online Apply 2024 l घरबसल्या मोफत गॅस सिलिंडरचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे करा अर्ज