Salman Khan नं स्वतःच्या पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; शाहरुख खानचा झाला मोठा फायदा!

Salman Khan | बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये फक्त एकच नाव गुंजत होते ते म्हणजे शाहरूख खान. बॉक्स ऑफिस असो की मग चाहत्यांच्या तोंडी… शाहरूखने कलाकार म्हणून 2023 हे वर्ष गाजवले असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. कारण मागील वर्षात अनेक बॉलिवूड चित्रपट असे होते ज्यांना चाहत्यांना भुरळ घालता आली नाही. प्रेक्षकांनी चित्रपटांकडे फिरवलेली पाठ शाहरूखच्या चित्रपटांना मात्र अपवाद ठरली.

गेल्या वर्षी तीन चित्रपटांनी मनोरंजन केल्यानंतर आता चाहते शाहरुख खानच्या पुढील चित्रपटाची वाट पाहत आहेत. शाहरूख खानला पुढचा चित्रपट मिळाला असल्याचे कळते आहे. खरं तर हा तोच चित्रपट आहे, जो सलमान खानला मिळाला होता. पण त्याच्या एका चुकीमुळे शाहरूखचा मोठा फायदा झाला असून तो या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 2023 मध्ये शाहरुख खानने आपल्या तीन चित्रपटांनी खूप धमाल केली होती.

शाहरुख खानचा मोठा फायदा

मागील वर्षात शाहरूखचे तिन्ही चित्रपट तुफान चालले. त्याने केवळ प्रेक्षकांची मनं जिंकली नाहीत तर बॉक्स ऑफिसचा बादशाह बनण्यातही यश मिळवले. आता सगळ्यांनाच त्याच्या पुढच्या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. शाहरुख खानच्या पुढील चित्रपटाबाबतही एक मोठे अपडेट समोर आले आहे. सलमान खानचे सेटवरून रागाने निघून जाणे शाहरुख खानच्या कामी आल्याचे दिसते. कारण यामुळे शाहरूख खानला कधीकाळी सलमानचा असलेला चित्रपट मिळाला.

Salman Khan च्या चित्रपटात शाहरूख!

शाहरूख खान लवकरच त्याच्या नवीन चित्रपटाची अधिकृत माहिती देईल. शाहरुख खानने चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याशी पुढच्या प्रोजेक्टवर बोलणी सुरू केल्याचे वृत्त आहे. हा तोच चित्रपट आहे जो आधी सलमान खान करणार होता. सध्या संजय लीला भन्साळी त्यांचा पुढचा चित्रपट ‘हीरा मंडी’च्या पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये व्यग्र आहेत. मे महिन्यापर्यंत या चित्रपटाचे चित्रीकरणही होणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाशिवाय त्यांचा ‘बैजू बावरा’ही चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

या सगळ्यामध्ये भन्साळी आणखी काही चित्रपटांच्या स्क्रिप्टवर काम करत असल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. यापैकी एक चित्रपट म्हणजे ‘इंशाअल्लाह’. या मुद्द्यावर भन्साळी गेल्या काही महिन्यांत एक-दोनदा शाहरुख खानला देखील भेटले आहेत. मात्र भन्साळींना आलिया भट्ट आणि सलमान खानसोबत हा चित्रपट बनवायचा होता. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर सेटही तयार झाला होता. पण चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच चित्रीकरण थांबवण्यात आले.

सलमानने रागात सेट सोडला?

सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांच्यात काही मतभेद निर्माण झाले. पण आता तो भूतकाळ झाला आहे. परंतु, भन्साळींना या चित्रपटासाठी ज्या व्यक्तिरेखेची आवड होती ती म्हणजे सलमान खान. त्यासाठी त्यांना दुसरा खान सापडला, तो म्हणजे शाहरुख. आता दोघांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. शाहरुख खानही या प्रोजेक्टमध्ये रस दाखवत असल्याचे बोलले जात आहे.

News Title- Shah Rukh Khan is getting a new movie because of Salman Khan’s mistake
महत्त्वाच्या बातम्या –

Jackie Shroff यांचं सोशल मीडियावर होतंय कौतुक, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल एक नं भिडू

Sania Mirza | ‘जी गोष्ट तुमची शांतता…’; घटस्फोटाच्या चर्चेनंतर सानियाची पोस्ट

Food Combos | अंड्यासोबत ‘या’ गोष्टी खाणं टाळा, अन्यथा होतील गंभीर परिणाम

Nagarjuna | ‘मी मोदींचा अपमान…’; अभिनेता नागार्जुनचा सर्वांत मोठा निर्णय!

Ram Mandir | हमारे राम आए हैं…, विराट आणि अनुष्काचा आनंद गगनात मावेना