Nagarjuna | ‘मी मोदींचा अपमान…’; अभिनेता नागार्जुनचा सर्वांत मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nagarjuna | देशात सध्या ‘लक्षद्वीप-मालदीव’ (Lakshadweep-Maldives dispute) प्रकरण चर्चेत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला भेट दिली होती. या दौऱ्याचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र यानंतर मालदीवमधील नव्या सरकारमधील काही नेत्यांनी यावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्याने वाद निर्माण झाला आहे. झाहिद रमीझ या नेत्याने भारत पैसे कमवण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत असल्याचं म्हटल्याने हा वाद अजूनच पेटवून दिला. यानंतर देशभरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणी आता दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुनने (Nagarjuna) सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे.

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचा अपमान केल्यापासून अनेकांकडून मालदीवला जाण्यास विरोध करण्यात येत आहे. त्यात बॉलीवूड तसेच टॉलीवूडमधील कलाकारांचाही मोठा सहभाग आहे. आता अभिनेता नागार्जुनने मालदीवला जाण्यास विरोध दर्शवला आहे.

नागार्जुनने केली मोठी घोषणा

नागार्जुनने (Nagarjuna) मालदीवला सुट्टी साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या सर्व प्रकरणामुळे त्याने आपला हा प्लॅन कॅन्सल केला आहे. संगीतकार एमएम किरावनीसोबत बोलताना त्याने याची घोषणा केली आहे. “या 17 जानेवारीला मी फॅमिलीसोबत मालदीवला जाणार होतो. मालदीवचा वाद सुरू नसताना मी खूपदा तिथे गेलो आहे. मात्र, आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी आता लक्षद्वीपची वेगळी ओळख करुन दिली आहे. त्यामुळे मी माझा मालदीवचा प्लॅन कॅन्सल केला आहे”, असा खुलासा नागार्जुनने केला आहे.

कामामबद्दल बोलायचं तर अभिनेता नागार्जुन (Nagarjuna) लवकरच ‘ना सामी रंग’ या चित्रपटात दिसून येणार आहे. हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र, सध्या नागार्जुन त्याच्या या निर्णयामुळे चर्चेत आला आहे. या प्रकरणावर आतापर्यंत अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, सारा अली खान, पूनम पांडे यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

‘मालदीव-लक्षद्वीप ‘ प्रकरण नेमकं काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्याची फोटो पोस्ट केल्यानंतर मालदीव (Lakshadweep-Maldives dispute) मधील मंत्र्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. मोदींच्या लक्षद्वीप भेटीमुळे मालदीवला मोठा फटका बसणार असल्याचे तेथील मंत्री झाहिद रमीझ यांनी म्हटले.

यावरच न थांबता त्यांनी “आम्ही जशी सेवा पुरवितो, तशी सेवा लक्षद्वीप देऊ शकते का? ते स्वच्छता पाळू शकतात का? हॉटेलच्या खोल्यामध्ये प्रचंड घाण वास येतो, त्याचे काय करणार?’,असा सवाल करत मोदींवर टीका केली. आणि येथूनच या वादाची सुरुवात झाली. या प्रकरणी नागार्जुन (Nagarjuna ) यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

News Title- Superstar Nagarjuna biggest decision

महत्वाच्या बातम्या- 

Acharya Chanakya | यशस्वी व्हायचं असेल तर ‘अशा’ लोकांपासून लांबच राहा!

Life Insurance l लाईफ इन्शुरन्स घेण्याचा विचार करताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा…

Amitabh Bachchan यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

IT Recruitment 2024 l कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार! आयकर विभागाअंतर्गत नोकर भरती सुरु; आजच अर्ज करा

Weather Update | थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा