BCCI | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) दरवर्षी नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा करत असते. नवीन वर्ष सुरू होताच भारतीय क्रिकेटपटूंना नवीन कराराची प्रतीक्षा असते. (BCCI Annual Contract List) खासकरून सध्या संघाबाहेर असलेले खेळाडू या कराराची आतुरतेने वाट पाहत असतात. मागील वर्षी मार्चच्या अखेरीस या कराराची घोषणा करण्यात आली होती. यंदा देखील असेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पण, यावेळी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. शिखर धवन, दीपक हुडा, उमेश यादव आणि चेतेश्वर पुजारा यांना बीसीसीआयकडून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. तर शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांना त्यांच्या जबरदस्त कामगिरीचे बक्षीस मिळू शकते. तसेच काही युवा खेळाडूंच्या नावांना देखील प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या खेळाडूचा केंद्रीय करारामध्ये समावेश केल्यास त्याचे वार्षिक उत्पन्न निश्चित केले जाते, जे बीसीसीआयकडून दिले जाते.
नामांकित खेळाडूंचा होणार पत्ता कट
त्यामुळे या करारात आपल्याही नावाचा समावेश असावा अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांना या करारात स्थान मिळाले तर त्यांना नक्कीच लॉटरी लागेल. बीसीसीआयच्या कराराच्या यादीत 4 श्रेणी आहेत. A+ श्रेणीतील खेळाडूला 7 कोटी रुपये, A मधील 5 कोटी, B मधील 3 कोटी आणि सर्वात कमी C श्रेणीतील शिलेदाराला वार्षिक 1 कोटी रुपये मिळतात. या सर्व श्रेणींमध्ये खेळाडूंचा समावेश करण्यासाठी काही नियम आहेत.
A+ मध्ये अशा खेळाडूंना स्थान मिळते जे तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे प्रतिनिधित्व करतात. कसोटी, ट्वेंटी-20 आणि वन डे खेळणाऱ्या खेळाडूंना A+ श्रेणी मिळते. आताच्या घडीला या श्रेणीत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे आहेत. यशस्वी जैस्वालने जुलै 2023 पासून आतापर्यंत भारतासाठी कसोटी आणि ट्वेंटी-20 दोन्ही मिळून 20 सामने खेळले आहेत. या आधारे तो B श्रेणीत येऊ शकतो.
BCCI देणार सरप्राईज!
बीसीसीआयने मार्च 2023 मध्ये शेवटची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जारी केली होती, ज्यामध्ये एकूण 26 खेळाडूंचा समावेश होता. पण त्या यादीतून काही जणांना वगळले जाऊ शकते. यावेळी चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, दीपक हुडा आणि उमेश यादव यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. पुजारा शेवटचा जून 2023 मध्ये WTC फायनलमध्ये खेळला होता. धवनने डिसेंबर 2022 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला, तर हुडा फेब्रुवारी 2023 मध्ये आणि उमेश यादव जून 2023 मध्ये शेवटच्या वेळी भारतीय संघात दिसला होता.
कोणत्या श्रेणीतील खेळाडूला किती पगार?
A+ श्रेणी – 7 कोटी रूपये
A श्रेणी – 5 कोटी रूपये
B श्रेणी – 3 कोटी रूपये
C श्रेणी – 1 कोटी रूपये
News Title- BCCI likely to drop Shikhar Dhawan from central contract deal
महत्त्वाच्या बातम्या –
Shaktiman फिल्मसाठी आता वाट पाहावी लागणार?, मोठी माहिती आली समोर
T20 World Cup खेळणार रिषभ पंत, करोडोंच्या मशीनवर असा सुरु आहे सराव
Salman Khan नं स्वतःच्या पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; शाहरुख खानचा झाला मोठा फायदा!
Jackie Shroff यांचं सोशल मीडियावर होतंय कौतुक, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल एक नं भिडू
Sania Mirza | ‘जी गोष्ट तुमची शांतता…’; घटस्फोटाच्या चर्चेनंतर सानियाची पोस्ट