प्रसिद्ध Actress नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याच्या मार्गावर, या एका गोष्टीमुळे साऱ्या बॅालिवूडमध्ये चर्चा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Actress | बॉलिवूडमध्ये घटस्फोट ही जणू काही सामान्यच बाब झाली आहे. आपल्या जोडीदारासोबत काही खटकले की कलाकार वेगळे राहण्याचा निर्णय घेतात. अर्थात घटस्फोट दिला जातो. इशा देओल आणि भरत तख्तानी यांच्यातील तुटलेल्या नात्याबद्दल बॉलीवूडमध्ये बरीच चर्चा रंगली आहे. खरं तर त्याची सुरुवात Reddit वर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे झाली. या जोडप्यामध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दोघेही कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसत नाहीत. यावरून बरीच अटकळ बांधली जात आहे. अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी इशा देओल तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. इशा आणि तिचा पती भरत तख्तानी एकमेकांपासून वेगळे झाल्याचे समजते. इशा आणि भरत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडपे म्हणूनही ओळखले जाते.

साऱ्या बॅालिवूडमध्ये चर्चा!

दोघे सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करायचे आणि इव्हेंटमध्ये एकत्र दिसायचे. मात्र मागील काही काळापासून असे होत नाही. अशा परिस्थितीत हे जोडपे वेगळे झाल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला. इशा देओल आणि भरत तख्तानी यांच्यातील तुटलेल्या नात्याबद्दल बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये बरीच गॉसिप सुरू आहे.

मिया आणि तिची पत्नी यांच्यात सर्व काही ठीक नाही, असे Reddit च्या पोस्टमध्ये म्हटले होते. अशा परिस्थितीत दोघेही वेगळे झाले आहेत, अशी चर्चा रंगली. यानंतर नेटकऱ्यांच्या लक्षात आले की, मागील वर्षी सुरू झालेल्या फेस्टिव्ह सीझनमध्ये इशा देओल एकटी तिची आई हेमा मालिनीसोबत दिसली होती. आमिर खानची मुलगी आयरा हिच्या रिसेप्शनला देखील ती आईसोबत आली होती.

Actress घटस्फोट घेणार असल्याची चर्चा

आईशिवाय इशा देओल तिच्या दोन मुलींसोबत दिसली. इशा लहान-मोठ्या कार्यक्रमांना एकटीच अटेंड करताना दिसली. वेगवेगळ्या दिवाळी पार्ट्यांनाही ती एकटीच हजेरी लावायची. आधी ती नेहमीच पती भरत तख्तानीसोबत कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये हजेरी लावायची. एवढेच नाही तर सासू हेमा मालिनी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनलाही भरतने हजेरी लावली नव्हती. यामुळे या जोडप्यामध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या अफवांनी आणखी जोर धरला.

काय आहे सत्य?

आता या जोडप्याशी संबंधित सूत्रांनीही या अफवांबद्दल भाष्य केले आहे. माहितीनुसार, इशा आणि भरतच्या विभक्त होण्याच्या सर्व बातम्या खोट्या आहेत. या जोडप्याने जून 2023 मध्ये त्यांच्या लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतचा एक रोमँटिक मोनोक्रोम फोटोही शेअर केला होता. इशा देओल आणि भरत तख्तानी यांचा विवाह 2012 मध्ये झाला होता.

News Title- discussion in Bollywood that the actress will divorce her husband
महत्त्वाच्या बातम्या –

Madhuri Dixit तेव्हा सेटवर रडली होता, तो सीन करायला… कलाकाराचा खळबळजनक दावा

Jawa 350 Launched in India l रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ला टक्करं देण्यासाठी Jawa 350 बाईक लाँच

BCCIचा मोठा निर्णय! शिखर धवनसह 4 बड्या खेळाडूंना धक्का, तर 2 नवोदित खेळाडूंना खास सरप्राईज!

Shaktiman फिल्मसाठी आता वाट पाहावी लागणार?, मोठी माहिती आली समोर

T20 World Cup खेळणार रिषभ पंत, करोडोंच्या मशीनवर असा सुरु आहे सराव