PAK vs NZ | 16 सिक्स अन् 5 चौकार! पाकिस्तानची लाज गेली; न्यूझीलंडच्या खेळाडूचं झंझावाती शतक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PAK vs NZ | पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील (PAK vs NZ 3rd T20) तिसरा ट्वेंटी-20 सामना म्हणजे पाकिस्तानी चाहत्यांसाठी वाईट स्वप्नच… सुरूवातीचे दोन सामने गमावल्यानंतर मालिकेत जिवंत राहण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाला न्यूझीलंडच्या 24 वर्षीय खेळाडूने घाम फोडला. बुधवारी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा ट्वेंटी-20 सामना खेळवला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला आपला निर्णय चांगलाच भोवला. न्यूझीलंडच्या फिन ॲलनने तब्बल 16 षटकार आणि 5 चौकार ठोकून शतक पूर्ण केले.

न्यूझीलंडच्या 24 वर्षीय फलंदाजाने पाकिस्तानी लाज काढली अन् शेजाऱ्यांची पळता भुई थोडी केली. वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले पाकिस्तानी गोलंदाज न्यूझीलंडच्या धरतीवर मात्र गारठले. नवनिर्वाचित कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात पाकिस्तान प्रथमच द्विपक्षीय मालिका खेळत आहे. ॲलनने ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीयमधील त्याचे दुसरे शतक झळकावले आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला फिन ॲलन सुरुवातीपासूनच आक्रमक दिसला. त्याने अर्धशतक केवळ 26 चेंडूत पूर्ण केले. मग आणखीनच आक्रमक होत ॲलनने पाकिस्तानी गोलंदाजांना आपले शिकार मानले आणि त्यानंतर त्याने जे केले ते पाहून पाकिस्तानी चाहत्यांना धक्का बसला.

48 चेंडूत शतक अन् 62 चेंडूत 137 धावा

अर्धशतक झाल्यानंतर त्याने पुढच्या 50 धावा आणखी वेगाने केल्या. यावेळी त्याने केवळ 22 चेंडू खेळले. अशा प्रकारे त्याने पाकिस्तानविरुद्ध अवघ्या 48 चेंडूत केलेल्या त्याच्या अतुलनीय शतकाची स्क्रिप्ट लिहिली. न्यूझीलंडच्या युवा खेळाडूने 62 चेंडूंचा सामना करत 137 धावा केल्या. या खेळीत त्याने 107 मीटर लांब षटकार आणि 5 चौकारांसह 16 गगनचुंबी षटकार मारण्याची किमया साधली.

PAK vs NZ थरार

आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानी गोलंदाजांचा ॲलनने चांगलाच समाचार घेतला. कर्णधार शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांच्याकडे देखील ॲलनच्या स्फोटक खेळीला उत्तर नव्हते. शाहीन आफ्रिदीने 4 षटकात 43 आणि हारिस रौफने 60 धावा दिल्या. फिन ॲलनला बाद करणारा गोलंदाज जमान खान होता, त्याने 4 षटकात 37 धावा दिल्या.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना शेजाऱ्यांसाठी ‘करा किंवा मरा’ असा होता. फिन ॲलनच्या झंझावाती शतकाचा परिणाम न्यूझीलंड संघाच्या स्कोअर बोर्डवरही झाला. अवघ्या 62 चेंडूत 137 धावा करत न्यूझीलंडने 20 षटकात 7 बाद 224 धावा केल्या.

News Title- New Zealand’s finn allen scored a century off 48 balls
महत्त्वाच्या बातम्या –

Raveena Tandon l कुणाचं कुणासोबत अफेअर… अभिनेत्री रविना टंडननं केला आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

प्रसिद्ध Actress नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याच्या मार्गावर, या एका गोष्टीमुळे साऱ्या बॅालिवूडमध्ये चर्चा!

Madhuri Dixit तेव्हा सेटवर रडली होता, तो सीन करायला… कलाकाराचा खळबळजनक दावा

Jawa 350 Launched in India l रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ला टक्करं देण्यासाठी Jawa 350 बाईक लाँच

BCCIचा मोठा निर्णय! शिखर धवनसह 4 बड्या खेळाडूंना धक्का, तर 2 नवोदित खेळाडूंना खास सरप्राईज!