प्राणप्रतिष्ठापणेपूर्वी मोदींना खुणावतेय ‘यांची’ कमी; आठवणीने झाले व्याकुळ

Narendra Modi | देशासाठी 22 जानेवारी हा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. देशासह संपूर्ण जगाची नजर असलेला ऐतिहासिक सोहळा या दिवशी होणार आहे. अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम (Ram Mandir) यांच्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. देशात राममय वातावरण झाले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांना एका गोष्टीची जाम कमी खुणावत आहे.

नरेंद्र मोदी यांना या सोहळ्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची कमी खुणावत आहे. लतादीदी यांच्या आठवणीत मोदी व्याकुळ झाले आहेत. त्यांनी आपल्या एक्सवर (पूर्वीचे ट्विटर )एक पोस्ट देखील केली आहे.मोदींची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

नरेंद्र मोदी ‘यांच्या’ आठवणीने व्याकुळ

“22 जानेवारीची देश मोठ्या उत्साहाने वाट पाहत असताना, ज्या व्यक्तींची उणीव भासणार आहे त्या म्हणजे आपल्या लाडक्या लता दीदी.त्यांनी गायलेला श्लोक येथे आहे.त्यांनी रेकॉर्ड केलेला हा शेवटचा श्लोक असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी मला सांगितले.”,अशी पोस्ट नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांनी एक्सवर केली आहे.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या शेवटच्या श्लोकचा व्हिडिओदेखील मोदींनी पोस्ट केला आहे. 6 फेब्रुवारी 2022 मध्ये लता दीदी यांचे निधन झाले. मोदींशी लता दीदी यांचे चांगले संबंध होते. लता दीदी नेहमी आपल्या सोशल मिडियावर मोदींबाबत पोस्ट शेअर करत असत. रक्षाबंधन दिवशी मोदी लता दीदी यांच्या आठवणीने भावुक देखील झाले होते. आता देशात होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त त्यांना पुन्हा लता दीदी यांची आठवण झाली.

‘या’ दिग्गजांना मिळालं प्राणप्रतिष्ठापणेचं निमंत्रण |

राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गजांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यात बॉलीवुड कलाकारांसोबतच क्रिकेट जगतातील अनेक खेळाडूंचाही सहभाग आहे. अभिनेत्री अनुष्का आणि विराट कोहली, अभिनेते रजनीकांत, महानायक अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, राम चरण, दीपिका चिखलिया, अरुण गोविल, अनुपम खेर, आयुष्मान खुराणा, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार, केजीएफ स्टार यश, चिरंजीवी, धनुष, प्रभास, माधुरी दीक्षित यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi ) या सोहळ्याला ऐतिहासिक सोहळा असल्याचे म्हटले आहे. यासाठी देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंदिराच्या उभारणीसाठी कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांना आता या सोहळ्याच्या दिवसाची प्रतिक्षा असणार आहे.

News Title- Narendra Modi remembered Lata Mangeshkar

महत्वाच्या बातम्या- 

Jaya Bachchan l Amitabh Bacchan नव्हे, मला हा हिरो आवडायचा!; जया बच्चन यांचा सर्वात मोठा खुलासा

Gold Rate Today l सोनं झालं स्वस्त! पाहा आजचे दर

Bank Holidays l फेब्रुवारी महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर

Prdhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana l या योजनेत अवघे 330 रुपये गुंतवा अन् निश्चिन्त राहा

PAK vs NZ | 16 सिक्स अन् 5 चौकार! पाकिस्तानची लाज गेली; न्यूझीलंडच्या खेळाडूचं झंझावाती शतक