धर्मेंद्र-हेमा मालिनीच्या लेकीच्या आयुष्यात मोठं वादळ; अफेअरबद्दल धक्कादायक गोष्टी आल्या समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Esha Deol | बॉलीवुडमध्ये घटस्फोटाच्या चर्चा जोरदार रंगत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा  गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत आहेत. आता यात अजून एका जोडीचे नाव सामील झाले आहे. हेमा मालिनी (Hema Malini) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांची लाडकी लेक ईशा देओल (Esha Deol) हिच्या आयुष्यात मोठं वादळ आल्याचे म्हटले जात आहे.

ईशा देओल हिच्या पतीचे परक्या महिलेसोबत संबंध असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लवकरच ईशा देखील घटस्फोट घेणार असल्याची माहीत मिळत आहे. याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाहीये. मात्र, एका रेडिट युजरने केलेल्या पोस्टमुळे या चर्चाला अजूनच हवा मिळत आहे.

ईशा देओलच्या पतीचे विवाहबाह्य संबंध?

ईशा देओलने (Esha Deol ) उद्योजक भरत तख्तानी (Bharat Takhtani) सोबत लग्न केल्यानंतर आपले फिल्मी करीअर सोडून दिले. ईशाने लग्नानंतर कुटुंबाला अधिक महत्व दिले. मात्र, आता तिच्या घटस्फोटाच्या चर्चामुळे एकच खळबळ उडाली आहे. यासोबतच दोघांच्या नात्याबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी देखील समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

ईशा आणि भरत यांनी 29 जून 2012 मध्ये इस्कॉन मंदिरात लग्न केले होते. त्यांना दोन मुलीदेखील आहेत. या जोडप्याला एकत्र शेवटी 2023 मध्ये हेमा मालिनी यांच्या वाढदिवशी पाहण्यात आले. यानंतर ते पुन्हा सोबत दिसलेच नाही. आमीर खानची मुलगी आयरा आणि नूपुरचा नुकताच विवाह झाला. आमीरने नंतर दिलेल्या रिसेप्शन पार्टीमध्ये देखील ईशा आई हेमा मालिनीसोबत दिसली. यामुळे ईशा आणि भरत वेगळे झाल्याचे अधिकच बोलले जात आहे.

ईशा देओलच्या आयुष्यात मोठं वादळ

अशातच एका ‘रेडिट’ युजरने ईशा (Esha Deol ) आणि भरत विभक्त झाल्याचे म्हणत पोस्ट केली आहे. यासोबतच त्याने अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत.’ईशा देओल तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. तिने पतीसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं बंद केलं आहे. ‘,असे या युजरने म्हटले आहे. यासोबतच भरतचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा देखील दावा या युजरने केला आहे.

ईशाचा (Esha Deol ) पती भरत न्यू इयरच्या दिवशी बेंगळुरू येथे एका पार्टीमध्ये गर्लफ्रेंडसोबत दिसून आला. भरतची ही गर्लफ्रेंड बेंगळुरू येथेच राहात असल्याचा दावाही या युजरने केला आहे. या पोस्टनंतर सोशल मिडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘भरतला पाहून असं वाटायचं तो त्याच्या पत्नी आणि मुलींवर प्रचंड प्रेम करतो…’,असे एका युजरने म्हटले. तर अन्य एका युजरने ‘हेमा मालिनी यांच्यासोबत झालं ते ईशा हिच्यासोबत व्हायलं नको…’, असे म्हटले आहे.त्यामुळे ईशा लवकरच घटस्फोट घेणार असल्याचा जाम चर्चा सध्या होत आहेत.

News Title- Shocking revelations in Esha Deol life

महत्वाच्या बातम्या-

Jaya Bachchan l Amitabh Bacchan नव्हे, मला हा हिरो आवडायचा!; जया बच्चन यांचा सर्वात मोठा खुलासा

Gold Rate Today l सोनं झालं स्वस्त! पाहा आजचे दर

Bank Holidays l फेब्रुवारी महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर

Prdhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana l या योजनेत अवघे 330 रुपये गुंतवा अन् निश्चिन्त राहा

PAK vs NZ | 16 सिक्स अन् 5 चौकार! पाकिस्तानची लाज गेली; न्यूझीलंडच्या खेळाडूचं झंझावाती शतक