Aishwarya Rai आहे ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण; कमाईच्या बाबतीत या अभिनेत्रींना टाकलं मागं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aishwarya Rai | ‘विश्वसुंदरी’ ऐश्वर्या राय कोणत्याच गोष्टीत मागे नाहीये. आता नुकतीच ती भारतातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत अव्वल आली आहे. कमाईच्या बाबतीत तीने मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. टॉप टेन अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या प्रथक (Aishwarya Rai ) क्रमांकावर आली आहे. आपल्या सौंदर्याने नेहमीच चाहत्यांना घायाळ करणारी ऐश्वर्या काही दिवसांपासून घटस्फोटामुळे चर्चेत आहे. आता या यादीमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

ऐश्वर्या रायकडे (Aishwarya Rai ) 800 मिलियन संपत्ती असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वांत श्रीमंत अभिनेत्री ठरल्याने तिच्या चाहत्यांनाही बराच आनंद झाला आहे. बच्चन कुटुंबाची सुन अभिनयाच्या बाबतीत अव्वल आहेच, मात्र अभिनयाच्या जोरावर ती कमाईच्या बाबतीतही अव्वल ठरली आहे.

‘एवढ्या’ संपत्तीची मालकीण आहे ऐश्वर्या

ऐश्वर्या रायकडे (Aishwarya Rai ) 100 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 800 कोटींची संपत्ती आहे. ऐश्वर्या फक्त अभिनयातूनच नव्हे तर ब्रँड एंडोर्समेंटमधूनही बक्कळ पैसा कमावते. एका चित्रपटासाठी ती 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेते. तर जाहिरात आणि ब्रँड एंडोर्समेंटमधुन ती वर्षाला 80 ते 90 कोटी रुपये कमावते.

अनेक आलिशान गाड्या आणि लग्जरी बंगल्याची ती मालकीण आहे. 1997 मध्ये ऐश्वर्याने मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ या चित्रपटातून आपल्या करीअरची सुरुवात केली होती. तर, बॉबी देओल सोबत ‘और प्यार हो गया’हा तिचा पहिला बॉलीवुडपट होता. तीने देवदास, धूम, हम दिल दे चुके सनम, जोधा अकबर, मोहब्बते, ए दिल हे मुश्किल, पोन्नियिन सेल्वन अशा सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. फक्त भारतातच नाही, तर जगभरात ऐश्वर्याचे चाहते आहेत.

‘या’ आहेत भारतातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री

श्रीमंत अभिनेत्रीच्या यादीबद्दल बोलायचे झाले तर, ऐश्वर्यानंतर (Aishwarya Rai ) दुसऱ्या नंबरवर प्रियंका चोप्राने बाजी मारली आहे. प्रियंकाची तब्बल 620 कोटी संपत्ती आहे. प्रियंका ही बॉलीवुड तसेच हॉलीवुडची ग्लोबल आयकॉन म्हणून प्रचलित आहे. निक जोनस सोबत लग्न करून ती अमेरिकेतच स्थायिक झाली आहे.

तर, बॉलीवुडची मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण या यादीत तिसऱ्या नंबरवर आहे. दीपिकाकडे एकूण 500 कोटींची संपत्ती आहे. तर. 440 कोटींच्या संपत्तीसह करीना कपूर चौथ्या क्रमांकांची अभिनेत्री ठरली आहे. या यादीत अनुष्का शर्मा पाचव्या नंबरवर आहे. अनुष्काची 255 कोटींची संपत्ती आहे. मात्र, या सर्व यादीत ऐश्वर्या राय बच्चनच (Aishwarya Rai ) टॉप ठरली आहे.

News Title- Aishwarya Rai became Indias richest actress

महत्वाच्या बातम्या-

Jaya Bachchan l Amitabh Bacchan नव्हे, मला हा हिरो आवडायचा!; जया बच्चन यांचा सर्वात मोठा खुलासा

Gold Rate Today l सोनं झालं स्वस्त! पाहा आजचे दर

Bank Holidays l फेब्रुवारी महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर

Prdhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana l या योजनेत अवघे 330 रुपये गुंतवा अन् निश्चिन्त राहा

PAK vs NZ | 16 सिक्स अन् 5 चौकार! पाकिस्तानची लाज गेली; न्यूझीलंडच्या खेळाडूचं झंझावाती शतक