MS Dhoni | महेंद्रसिंग धोनी सापडला मोठ्या संकटात, ‘या’ कारणामुळे दाखल झाली केस

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MS Dhoni | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni ) याला मोठा धक्का बसला आहे. धोनीविरोधात मानहानीची केस करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी त्याने मिहिर दिवाकर ( Mihir Diwakar)आणि त्याची पत्नी सौम्या दासविरोधात 15 कोटीचा चुना लावल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी धोनीने रांची येथे पोलिस तक्रारही केली होती.

मात्र, आता मिहिर दिवाकरने पलटवार करत धोनीवरच मानहानीचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी येत्या 18 जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे धोनी मोठ्या अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. या माहितीमुळे धोनीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

नेमकं प्रकरण आहे काय?

सदर प्रकरण हे 2017 मधील असल्याची माहिती मिळत आहे. मिहिर दिवाकरने महेंद्रसिंग धोनीसोबत (MS Dhoni ) 2017 मध्ये जगभरात क्रिकेट अकादमी उघडण्यासाठी करार केला होता. मात्र दिवाकर याने यासाठी करण्यात आलेल्या करारात नमूद केलेल्या अटींचे पालन न केल्यामुळे अरका स्पोर्ट्सला फ्रँचायझी (Arka Sports Franchise) फी भरावी लागली होती.

हा करार झालेला नफा वाटून घेण्याबाबत होता. मात्र, मिहिर दिवाकरने या नियमांचे कोणतेच पालन न केल्याने त्याच्यावर धोनीने गुन्हा नोंदवला होता. यामुळे धोनीला तब्बल 15 कोटींचं नुकसान झालं आहे. 15 ऑगस्ट 2021 मध्ये धोनीकडून अरका स्पोर्ट्सला अनेक कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्या. मात्र, त्यावर काहीच पाऊल उचलण्यात आलं नाही. यानंतर धोनीचे वकील दयानंद सिंह यांनी अरका स्पोर्ट्सने फसवणूक केल्याचा दावा करत 15 कोटींहून अधिक नुकसान झाले असल्याचे म्हटले होते.

धोनीवर नेमके कोणते आरोप?

महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni ) मिहिर दिवाकरवर 15 कोटीच्या धोक्याचा आरोप लावल्यानंतर मिहिरने या आरोपांमुळे आमची बदनामी झाल्याचे म्हटले आहे. तसेच हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.  या प्रकरणी कोर्टाने निर्णय देण्यापुर्वीच धोनीचे वकील दयानंद सिंह यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमच्यावर अनेक आरोप केले आहेत. या आरोपांमुळे आमची मानहानी झाल्याचे मिहिर दिवाकरने म्हटले आहे.

या प्रकरणी मिहिर दिवाकरने धोनीवरच (MS Dhoni ) पलटवार करत मानहानीचा दावा ठोकला आहे. तसेच, धोनी आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्यांवरही त्यांनी आरोप केले आहेत. यासोबतच मिहिर दिवाकरने सोशल मिडियावर त्याच्याबाबत जी मानहानीची पोस्ट करण्यात आली आहे, त्या सर्व हटवण्यात याव्या अशी मागणीही केली आहे. आता मिहिर दिवाकरने केलेल्या आरोपावर 18 जानेवारीला न्यायाधीश प्रतिभा एम सिंह निर्णय देणार आहे. या प्रकरणी धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

News Title-Defamation case against MS Dhoni

महत्वाच्या बातम्या-

Jaya Bachchan l Amitabh Bacchan नव्हे, मला हा हिरो आवडायचा!; जया बच्चन यांचा सर्वात मोठा खुलासा

Gold Rate Today l सोनं झालं स्वस्त! पाहा आजचे दर

Bank Holidays l फेब्रुवारी महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर

Prdhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana l या योजनेत अवघे 330 रुपये गुंतवा अन् निश्चिन्त राहा

PAK vs NZ | 16 सिक्स अन् 5 चौकार! पाकिस्तानची लाज गेली; न्यूझीलंडच्या खेळाडूचं झंझावाती शतक