Aishwarya Rai घटस्फोटांच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच बोलली, अभिषेक बच्चनला थेट म्हणाली…

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत आहेत. ऐश्वर्याने काही दिवसांपूर्वीच सासरे अमिताभ बच्चन यांना देखील सोशल मीडियावर अनफाॅलो केल्याची चर्चा होती. एवढेच नाही, तर तीने अभिषेकचे घर देखील सोडले असल्याची चर्चा आहे.

बच्चन कुटुंबातील कौटुंबिक वाद इतके टोकाचे गेले आहेत की, या जोडीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याच्या देखील चर्चा रंगल्या. या सर्व प्रकरणावर आता ऐश्वर्या रायने पहिल्यांदाच मोठे भाष्य केले आहे. एका मुलाखतीमध्ये तीने सर्व खुलासा केला आहे.

ऐश्वर्याने केला मोठा खुलासा

ऐश्वर्याने (Aishwarya Rai) एका मुलाखतीमध्ये पती अभिषेक बच्चनला ‘बेस्ट हजबंड’ म्हटले आहे. तसेच त्याच्याबद्दल आपले प्रेम आणि आदर देखील व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी तीने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला होता. त्यामुळे मुलाखत जुनी असली तरी, आता ती चर्चेत आली आहे.

या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या पहिल्यांदाच अभिषेक बच्चन याच्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर बोलताना दिसली. अभिषेक आणि ऐश्वर्या लवकरच वेगळे होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या दोघांनी अधिकृतपणे याबाबत अजून कोणतेही भाष्य केले नाहीये. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

Aishwarya Rai Divorce News-

काही दिवसांपुर्वी ऐश्वर्याची (Aishwarya Rai) मुलगी आराध्या बच्चनचा शाळेत एक कार्यक्रम होता. यावेळी दोघेही वेगळ्या गाड्यांमध्ये आल्याचे दिसून आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. त्यातच, ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याला पाहून त्याच्याकडे बोलण्यासाठी येत असताना अभिषेकने तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचेही दिसून आले. याचा व्हिडिओ वाऱ्यासारख व्हायरल झाला.

अभिषेकने ऐश्वर्याना दुर्लक्ष केल्यामुळे चाहते हैराण झाले. यावेळी ऐश्वर्या रायच्या चेहऱ्यावरचे हावभावदेखील सर्वांच्या नजरेत पडले. हा व्हिडिओ पाहून दोघांत काहीही आलबेल नसल्याचेच दिसून आले. त्यामुळे ही जोडी आता लवकरच विभक्त होणार असल्याच्या चर्चा अजूनच रंगू लागल्या.

ऐश्वर्या (Aishwarya Rai) अशा चर्चेतच स्टेडियममध्ये तीचे सासरे अमिताभ बच्चन सोबत दिसून आली होती. अभिषेकच्या जयपुर पिंक पँथर्स या कबड्डी संघाला ऐश्वर्या पूर्ण कुटुंबासोबत चीअर करताना दिसून आली होती. ऐश्वर्या (Aishwarya Rai) पती अभिषेक, अमिताभ बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत जयपूर पिंक पँथर्सची जर्सी घालून स्टँडमध्ये बसली होती. एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना या जोडीला एकत्र पाहून चाहते बुचकळ्यात पडले आहे. मात्र, त्यांनी वेगळे होऊ नये अशी आशाही व्यक्त केली जात आहे.

News Title- Aishwarya Rai big revelation about divorce

महत्वाच्या बातम्या- 

Jaya Bachchan l Amitabh Bacchan नव्हे, मला हा हिरो आवडायचा!; जया बच्चन यांचा सर्वात मोठा खुलासा

Gold Rate Today l सोनं झालं स्वस्त! पाहा आजचे दर

Bank Holidays l फेब्रुवारी महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर

Prdhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana l या योजनेत अवघे 330 रुपये गुंतवा अन् निश्चिन्त राहा

PAK vs NZ | 16 सिक्स अन् 5 चौकार! पाकिस्तानची लाज गेली; न्यूझीलंडच्या खेळाडूचं झंझावाती शतक