Rashmika Mandanna च्या चाहत्यांना मोठा धक्का; लग्नाबाबत घेतला मोठा निर्णय?

Rashmika Mandanna | अभिनेत्री रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबतच्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत होती. यात साकारलेल्या भुमिकेमुळे तिला ट्रोलही केले गेले आणि पसंतही तितकेच केले गेले. त्यातच ती लवकरकच अभिनेता विजय देवरकोंडासोबत संसार थाटणार असल्याचे म्हटले गेले. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार तीने लग्नाचा निर्णय कॅन्सल केल्याचे म्हटले जात आहे.

‘गीता-गोविंदम’ या चित्रपटापासूनच रश्मिका (Rashmika Mandanna ) आणि विजयच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या. त्यांच्या जोडीला प्रेक्षकही पसंत करतात. काही दिवसांपूर्वीच हे दोघे फेब्रुवारीमध्ये लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले गेले. मात्र, त्यांनी आताच लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. या माहितीमुळे नॅशनल क्रश रश्मिकाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

रश्मिकाने लग्नाचा निर्णय केला कॅन्सल?

रश्मिका (Rashmika Mandanna ) आणि विजय (Vijay Deverakonda ) सध्या लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत आणि ते यातच खूप खुश आहेत. त्यामुळे त्यांना आताच लग्नाची घाई करायची नाहीये. दोघांनाही सध्या करीअरवर लक्ष द्यायचे असल्याने त्यांनी लग्नाचा प्लॅन कॅन्सल केला आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये त्यांचे लग्न होणार नाही. रश्मिकाच्या चाहत्यांना या बातमीमुळे नक्कीच दुःख होणार आहे.

विजय आणि रश्मिका यांनी गीता गोविंदम आणि डियर कॉमरेड या चित्रपटांत एकत्र काम केले आहे. त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावते. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरपूर पसंती दिली. त्यातच रश्मिकाच्या क्यूटनेसवर चाहते घायाळ होतात. या दोघांना कायमचे एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. मात्र, त्यांनी आताच लग्न करण्याचा निर्णय न घेतल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. याबाबत दोघांनीही अधिकृत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

‘या’ चित्रपटात दिसणार रश्मिका-विजय

रश्मिका (Rashmika Mandanna ) आणि विजय यांच्या कामाबद्दल बोलायचे तर, अॅनिमल नंतर रश्मिका लवकरच ‘पुष्पा 2’ मध्ये अभिनेता अल्लू अर्जुन सोबत दिसून येणार आहे. या चित्रपटाची शूटिंगदेखील सुरू झाली आहे. पुष्पा या चित्रपटाच्या पहिल्या पार्टमध्ये देखील रश्मिकाच होती. आपल्या अभिनयाने तीने अनेकांना घायाळ केले आहे. आता तिच्या पुष्पा 2 चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

तर, अभिनेता विजय देवरकोंडा हा ‘फॅमिली स्टार’ आणि ‘VD 12’ या चित्रपटात दिसणार आहे. सध्या तो VD 12 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दोघांचेही चाहते त्यांच्या अपकमिंग चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

News Title- Rashmika Mandanna Vijay Deverakonda Relationship

महत्वाच्या बातम्या-

Aishwarya Rai घटस्फोटांच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच बोलली, अभिषेक बच्चनला थेट म्हणाली…

94 लाख परिवारांचं नशीब उजळलं, प्रत्येक कुटुंबाला मिळणार 2 लाख रुपये!

Jaya Bachchan l Amitabh Bacchan नव्हे, मला हा हिरो आवडायचा!; जया बच्चन यांचा सर्वात मोठा खुलासा

Gold Rate Today l सोनं झालं स्वस्त! पाहा आजचे दर

Bank Holidays l फेब्रुवारी महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर