Rohit Sharma | मी एकटाच पुरेसा आहे! अफगाणिस्ताननं अनुभवलं रोहित शर्मा नावाचं वादळ!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | अफगाणिस्तानविरूद्धची ट्वेंटी-20 मालिका सुरूवातीला भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी खास राहिली नाही. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये रोहितला शून्यावर तंबूत परतावे लागले होते. पण, तिसऱ्या सामन्यात रोहितने शतकी खेळी करून इतिहास रचला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच शतके झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. पहिल्या दोन सामन्यांतील कसर त्याने तिसऱ्या सामन्यात भरून काढली आणि शानदार शतक ठोकले.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक शैलीने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना घाम फोडला. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात खातेही उघडू न शकलेल्या रोहितने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात स्फोटक फलंदाजी करताना शानदार शतक झळकावले. या शतकासह त्याने इतिहास रचत ट्वेंटी-20 मध्ये पाच शतके झळकावणारा खेळाडू बनण्याची किमया साधली.

रोहितने अवघ्या 64 चेंडूत हे शतक पूर्ण केले आणि पुन्हा एकदा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. रोहितने रिंकू सिंगसोबत 190 धावांची अप्रतिम भागीदारी नोंदवली आणि टीम इंडियाला 212 धावांपर्यंत पोहोचवले. या मालिकेतूनच रोहित शर्माचे 14 महिन्यांनंतर ट्वेंटी-20 संघात पुनरागमन झाले आहे. रोहितने जबरदस्त शतक झळकावून जोरदार पनरागमन केले.

 

सुरुवातीला संघर्ष अन् धावांचा पाऊस

अखेरच्या सामन्यात देखील रोहितची सुरूवात चांगली झाली नव्हती. पहिल्या षटकापासून तो धावांसाठी संघर्ष करताना दिसला. अशातच दुसऱ्या बाजूने यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे आणि संजू सॅमसनच्या रूपाने भारताने स्वस्तात 4 गडी गमावले. त्यामुळे रोहितवरचा दबाव आणखीनच वाढला. अवघ्या 22 धावांत 4 विकेट पडल्यानंतर रोहितने संघाची धुरा सांभाळली.

Rohit Sharma चा रूद्रावतार

बराच वेळ रोहित 100 पेक्षा कमी स्ट्राईक रेटने फलंदाजी करत राहिला. अखेरीस रोहितने चौकार गोळा करण्यास सुरुवात केली आणि 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारतीय कर्णधाराला रिंकू सिंगने चांगली साथ दिली. रोहितने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना सीमारेषेपलीकडील मैदानाचा प्रत्येक भाग दाखवला. रोहितने अर्धशतक पूर्ण करताच पुढच्या 23 चेंडूत शतकापर्यंत मजल मारली. भारतीय कर्णधाराने 19व्या षटकात 64 चेंडूत सलग 6, 4 आणि 4 धावा ठोकत आपले 5 वे शतक पूर्ण केले. यासह त्याने स्वत:चा विक्रम आणखी मजबूत केला. याआधी रोहितशिवाय सूर्यकुमार यादव आणि ग्लेन मॅक्सवेल यांनीही 4-4 शतके झळकावण्याची किमया साधली होती. रोहित शर्माने 69 चेंडूत 8 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 121 धावांची नाबाद शतकी खेळी केली.

 

Rinku Singh ची मोलाची साथ

भारताने निर्धारित 20 षटकात 212 धावा कुटल्या. अखेर रोहित 69 चेंडूत 121 धावा करून नाबाद परतला. या खेळीत रोहितने 11 चौकार आणि 8 जबरदस्त षटकार मारले. रोहितच्या ट्वेंटी-20 कारकिर्दीतील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. या सामन्यात रोहितला रिंकू सिंगचीही चांगली साथ मिळाली, ज्याने मधल्या फळीत फिनिशर म्हणून आपली छाप सोडली आहे.

रिंकू सिंग आणि रोहित शर्मा या दोघांनी केवळ 95 चेंडूत 190 धावांची भागीदारी केली, जो भारतासाठी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 मध्ये एक नवा विक्रम आहे. दोघांनी शेवटच्या षटकात 5 षटकारांसह 36 धावा केल्या. रिंकूने अवघ्या 39 चेंडूत 69 धावा (2 चौकार, 6 षटकार) ठोकले. अखेरच्या 5 षटकात दोघांनी मिळून 103 धावांचे योगदान दिले.

News Title- Rohit Sharma scored 121 off 69 balls against Afghanistan
महत्त्वाच्या बातम्या –

IND vs AFG | बलाढ्य टीम इंडियाला अफगाणिस्तानने फोडला घाम, डबल सुपर ओव्हरपर्यंत नेला सामना

Video | अबब! रोहित-रिंकू अक्षरशः तुटून पडले, शेवटच्या ओव्हरमध्ये रेकॅार्डब्रेक धावांचा पाऊस

Benefits of clove | सर्दी-खोकल्याच्या त्रासाने त्रस्त आहात?, मग करा ‘हा’ उपाय

Rashmika Mandanna च्या चाहत्यांना मोठा धक्का; लग्नाबाबत घेतला मोठा निर्णय?

Ram Mandir | रामनगरीला आनंद गगनात मावेना; अयोध्येत परतले स्वयं ‘राम-सीता’ आणि लक्ष्मण