Ram Mandir | 22 जानेवारीला पाच राज्यातील शाळांना सुट्टी, पाहा यादी

Ram Mandir

Ram Mandir | देशभर सर्वत्र उत्साह असलेला भव्य कार्यक्रम होण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याची तयारी जोरात सुरू आहे. प्राणप्रतिष्ठेबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, या दिवशी अनेक राज्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय अनेक राज्यांनी दारूची दुकाने उघडण्यास बंदी घातली आहे. देशातील पाच राज्यांमध्ये या दिवशी शाळा बंद असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या भव्य कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांना राम मंदिर ट्रस्टच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. आतापासून अयोध्येत कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. मंदिर परिसरात सर्वत्र रोषणाई करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वीच यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. योगी यांनी सांगितले की, 22 जानेवारीला शाळा, महाविद्यालये आणि दारूची दुकाने बंद राहतील. या दिवशी कोणतीही शैक्षणिक संस्था उघडणार नाही.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशात देखील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी यापूर्वीच यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम हा एखाद्या उत्सवासारखा असल्याचे त्यांनी म्हटले होते. मध्य प्रदेशात या दिवशी दारूची दुकानेही बंद राहणार आहेत.

Ram Mandir उद्घाटनाच्या दिवशी गोव्यात शाळांना सुट्टी

गोवा सरकारने 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये देखील 22 जानेवारीला शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

हरयाणा

हरयाणा राज्य सरकारने रामललाच्या अभिषेक दिनी सरकारी शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार असल्याची घोषणा केली. याशिवाय 22 जानेवारीला दारूची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या दिवशी राज्यात कुठेही मद्यविक्री करता येणार नाही.

News Title- A holiday has been declared for schools in five states on January 22
महत्त्वाच्या बातम्या –

Central Government Alert On Cyber Crime l सरकारकडून मोठा इशारा!, विना OTP बँक अकाऊंट होतायेत खाली, चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी

Viral Video । छोट्या हत्तीवर घेऊन चाललेत मोठा हत्ती, व्हिडीओ पाहून लोक झालेत हैराण!

Female Teacher Sexually Abused 15 Year Old Student l 15 वर्षाच्या मुलासोबत शिक्षिकेनं ठेवले शारीरिक संबंध, असले मेसेज समोर आल्याने उडाली खळबळ

Rohit Sharma | आधीच 2 वेळा शून्यावर आऊट झालोय, त्यात तू… अंपायरवर भडकला रोहित शर्मा

Rohit Sharma | मी एकटाच पुरेसा आहे! अफगाणिस्ताननं अनुभवलं रोहित शर्मा नावाचं वादळ!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .