Nuclear Battery Technology l ऐकावं ते नवलच!, एकदा फोन चार्ज केला की 50 वर्षे चालणार बॅटरी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nuclear Battery Technology l चीन हा देश नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतो. अशातच चीनच्या बीजिंग येथील Betavolt कंपनीने एक अनोखा आणि जगावेगळा प्रयोग केला आहे. Betavolt कंपनीने अशी एक बॅटरी तयार केली आहे जी चार्ज न करता 50 वर्षे टिकणार आहे. चीनच्या या अनोख्या संशोधनामुळे स्मार्टफोनच्या जगात मोठा बदल होऊ शकतो.

बॅटरी चार्ज न करता 50 वर्षे टिकणार :

कंपनीने तयार केलेली बॅटरी ही चार्ज न करता 50 वर्षे टिकेल. ही एक आण्विक बॅटरी आहे. तसेच ही बॅटरी कोणत्याही स्मार्टफोनमध्ये बसवता येऊ शकते. विशेष बाब म्हणजे या बॅटरीचा आकार नाण्यापेक्षाही लहान आहे. तसेच ही बॅटरी अणुऊर्जेचे सूक्ष्मीकरण साकारणारी जगातील पहिली बॅटरी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या बॅटरीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून आगामी काळात ती स्मार्टफोन आणि ड्रोनसाठी तयार केली जाणार आहे. त्यामुळे इतर कंपन्यांना खरेदी करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या मिळवाव्या लागणार आहेत.

Nuclear Battery Technology l ही बॅटरी कशी काम करते?

ही बॅटरी आयसोटोपमधून निघणाऱ्या ऊर्जेचे विजेमध्ये रूपांतर करते. ही संकल्पना 20 व्या शतकात प्रथम विकसित झाली आहे. 2021-2025 च्या 14 व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत चीन अणु बॅटरीचे सूक्ष्मीकरण करण्याच्या दिशेने काम करत आहे. या बॅटरीमध्ये एक लेअर्ड डिझाइन आहे, ज्यामुळे अचानक शक्तीमुळे बॅटरीला आग लागण्याचा (Nuclear Battery Technology) किंवा फुटण्याचा धोका नाही. त्यामुळे 60 ते 120 अंश तापमानात ही बॅटरी आरामात काम करू शकते असा दावा कंपनीने केला आहे.

आण्विक बॅटरीमध्ये काय खास असणार? (Nuclear Battery Technology) :

– आण्विक बॅटरीचे उत्पादन स्मार्टफोन आणि ड्रोनसारख्या व्यावसायिक उत्पादनांसाठी उपयुक्त असणार आहे.
– ही बॅटरी एरोस्पेस, एआय उपकरणे, वैद्यकीय उपकरणे आणि मायक्रोफोनसह सेन्सर आणि लहान ड्रोन आणि मायक्रो रोबोटमध्ये वापरली जाऊ शकते.
– या नव्या शोधामुळे चीन जागतिक स्तरावर तंत्रज्ञानात आघाडीचे स्थान मिळवू शकेल.
– ही बॅटरी बाजारात 15 x15x5 मिमी आकारामध्ये येऊ शकते.
– ही बॅटरी 3 वॅट्सवर 100 मायक्रोवॅट पॉवर निर्माण करेल.
– या बॅटरीच्या रेडिएशनचा मानवी शरीरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही असे बीटावोल्ट कंपनीने सांगितले आहे.

News Title – Nuclear battery produces power for 50 years without needing to charge

महत्त्वाच्या बातम्या –

Central Government Alert On Cyber Crime l सरकारकडून मोठा इशारा!, विना OTP बँक अकाऊंट होतायेत खाली, चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी

Viral Video । छोट्या हत्तीवर घेऊन चाललेत मोठा हत्ती, व्हिडीओ पाहून लोक झालेत हैराण!

Female Teacher Sexually Abused 15 Year Old Student l 15 वर्षाच्या मुलासोबत शिक्षिकेनं ठेवले शारीरिक संबंध, असले मेसेज समोर आल्याने उडाली खळबळ

Rohit Sharma | आधीच 2 वेळा शून्यावर आऊट झालोय, त्यात तू… अंपायरवर भडकला रोहित शर्मा

Rohit Sharma | मी एकटाच पुरेसा आहे! अफगाणिस्ताननं अनुभवलं रोहित शर्मा नावाचं वादळ!