Virat Kohli l शून्यावर आऊट झाला विराट कोहली, मात्र कोहली नसता तर भारत हरला असता, कारण…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli l भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना काल (17 जानेवारी) पार पडला आहे. हा सामना बंगळुरूमधील के एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला आहे. या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी करताना चार विकेटच्या मोबदल्यात 212 धावा केल्या होत्या. या प्रत्युत्तरदाखल अफगाणिस्तानच्या संघाने 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबद्लायत 212 धावाच केल्या. त्यामुळे या सामन्यादरम्यान सुपरओव्हर खेळावी लागली.

विराट कोहलीने टीम इंडियाला पराभवापासून वाचवले :

मात्र पहिली सुपर ओव्हर देखील टाय झाली. त्यानंतर भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. मात्र या सुपरोव्हरमध्ये भारतीय संघाचे विजय मिळवला आहे. अशातच या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि रिंकूने दमदार फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

मात्र या सामन्यात विराट कोहली दमदार फलंदाजी करू शकला नसला तरी देखील त्याने क्षेत्ररक्षणात टीम इंडियाला पराभवापासून वाचवले आहे. अफगाणिस्तानच्या सामन्यातील 17व्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर विराट कोहलीने सीमारेषेजवळ हवेत उडी मारली आणि षटकार वाचवला आहे.

Virat Kohli l विराट कोहलीच्या या अप्रतिम फिल्डिंगमुळे अफगाणिस्तानला केवळ एकच धाव मिळाली. विराट कोहलीच्या या चमत्कारी फिल्डिंगमुळे अफगाणिस्तानला 212 धावांपर्यंत रोखण्यात टीम इंडिया यशस्वी ठरली आहे. अन्यथा भारतीय संघाचा पराभव निश्चित झाला असता.

Rohit Sharma l रोहित आणि रिंकूची तुफान फलंदाजी :

IND vs AFG 3rd T20 l अफगाणिस्तान विरुद्धच्या या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि रिंकूने त्याच्या तुफान फलंदाजीने खळबळ माजवली होती. सामन्यादरम्यान रोहित शर्माने 121 धावांची उत्कृष्ट खेळी केली आहे. या सामन्यात त्याने 69 चेंडू खेळात 11 चौकार आणि 8 षटकार ठोकले आहेत.

याशिवाय रिंकूने 39 चेंडूत 69 धावांची खेळी खेळली आहे. तसेच या जबरदस्त सामन्यात रिंकू आणि रोहितने एकूण मिळून 190 धावांची विक्रमी भागीदारी केली आहे.

News Title l Virat Kohli saved Team India from defeat

महत्त्वाच्या बातम्या-

SIP Tips to Invest l SIP मध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? मग त्याआधी या गोष्टी लक्षात घ्या

Pune News: पुण्यातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक आयुक्त नेमावा, सुनील माने यांची मागणी

Nuclear Battery Technology l ऐकावं ते नवलच!, एकदा फोन चार्ज केला की 50 वर्षे चालणार बॅटरी

Ram Mandir | 22 जानेवारीला पाच राज्यातील शाळांना सुट्टी, पाहा यादी

Central Government Alert On Cyber Crime l सरकारकडून मोठा इशारा!, विना OTP बँक अकाऊंट होतायेत खाली, चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी