IND vs AFG Super Over Match l Rohit Sharma पहिल्या सुपर ओव्हरमध्ये ‘आऊट’, तरी दुसऱ्या सुपर ओव्हरला बॅटिंगला कसा उतरला?, काय सांगतो नियम

IND vs AFG Super Over Match l क्रीडाप्रेमींसाठी कालचा दिवस खूप रोमांचक होता. कारण काल भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी20 सामना खूप अप्रतिम झाला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने अफगाणिस्तान समोर 213 धावांचे लक्ष ठेवले त्या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने देखील भारताला प्रतिउत्तर देत 212 धावा केल्या आणि अखेर हा सामना टाय झाला.

रोहित शर्मा पुन्हा फलंदाजीसाठी येणे योग्य होते का? :

त्यानंतर भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना पुढे सुपरओव्हर पर्यंत गेला. परंतु सुपरमध्ये देखील टाय झाली. परंतु या सामन्यात एक असा शान आला त्यावेळी सर्व भारतीयांचे डोळे उंचावले. कारण रोहित शर्मा सुपर ओव्हरमध्ये (IND vs AFG Super Over Match) अचानक बाहेर गेला. आपल्यासर्वांना माहिती आहे की सुपर ओव्हरचे नियम अत्यंत कडक असतात. अशावेळी रोहित बाहेर का गेला व तोच पुन्हा दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये कसा आला असे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना पडले होते.

मात्र तुम्हाला माहिती आहे का? सुपरओव्हर बाबत ICC चे नेमके नियम काय आहेत? (IND vs AFG Super Over Rules) रोहित शर्मा पुन्हा फलंदाजीसाठी येणे योग्य होते की अयोग्य? आपण याबाबत जाणून घेऊयात…

IND vs AFG Super Over Rules l नेमका काय सांगतो ICC चा नियम? :

ICC च्या 25.4.2 या नियमानुसार, जर एखादा फलंदाज चालू सामन्यात आजारपणामुळे, दुखापतीमुळे किंवा इतर कोणत्याही अपरिहार्य कारणामुळे निवृत्त झाला तर तो फलंदाज आपला डाव पुन्हा सुरू करण्याचा हक्कदार आहे. जर काही कारणास्तव असे झाले नाही तर त्या फलंदाजाची नोंद ‘रिटायर्ड – नॉट आउट’ म्हणून केली जाईल.

असेच काहीसे काल झालेल्या सामन्यात (IND vs AFG Super Over Rules) म्हणजे पहिल्या सुपर ओव्हरमध्ये जो फलंदाज बाद होतो, त्याला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करता येत नाही. पण रोहित हा पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झाला नव्हता, तर तो निवृत्त – ‘रिटायर्ड – नॉट आउट’ झाला होता. (IND vs AFG Super Over Match)

त्यामुळे तो बाद झाला नसल्यामुळे दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये खेळू शकतो, असा नियम त्यावेळी भारतीय समालोचकांनी सांगितला. त्यामुळे रोहित जर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झाला असता तर त्याला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये खेळता आले नसते. परंतु तो निवृत्त झाल्यामुळे त्याला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये खेळता आले.

IND vs AFG Super Over Rules l दरम्यान, रोहित शर्माने जेव्हा या सुपरओव्हरमध्ये निवृत्त व्हायचा निर्णय घेतला तेव्हा बऱ्याच जणांनी त्याच्यावर टीका केली. पण रोहितने हे निर्णय नियमाला धरून केला होता आणि त्या गोष्टीचा पुढे कसा फायदा झाला हे सर्वांना सामन्यानंतर पाहिला मिळाले आहे.

News Title : IND vs AFG Super Over Match

महत्त्वाच्या बातम्या-

Best tourist destinations near Pune | पुण्यापासून 150 किमीच्या आत असलेल्या या पर्यटनस्थळांना आवर्जून भेट द्या

Virat Kohli l शून्यावर आऊट झाला विराट कोहली, मात्र कोहली नसता तर भारत हरला असता, कारण…

SIP Tips to Invest l SIP मध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? मग त्याआधी या गोष्टी लक्षात घ्या

Pune News: पुण्यातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक आयुक्त नेमावा, सुनील माने यांची मागणी

Nuclear Battery Technology l ऐकावं ते नवलच!, एकदा फोन चार्ज केला की 50 वर्षे चालणार बॅटरी