Vidya balan | अभिनेत्री विद्या बालनच्या घरी पाळणा हालणार?, सर्वात मोठी माहिती झाली उघड

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vidya balan | अभिनेत्री विद्या बालन (Vidya balan) सोशल मिडियावर नेहमीच अपडेट टाकत असते. द डर्टी पिक्चर , कहानी, नियत, हमारी अधुरी कहानी, परिणिता, बेगम जान अशा अनेक हीट चित्रपटांत काम करून आपल्या अभिनयाने तीने अनेकांना भुरळ घातली आहे. आता विद्या बालनने तिच्या चाहत्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे.

याबाबत विद्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट देखील केली आहे. त्यामुळे विद्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगत आहेत. या पोस्टनंतर  सोशल मिडियावर चाहते विद्या बालन हिला शुभेच्छा देताना दिसले. त्यामुळे विद्या लवकरच बाळाला जन्म देणार असल्याचे म्हटले जात आहे. या पोस्टमुळे चाहत्यांनाही प्रचंड आनंद झाला आहे.

विद्या बालनची पोस्ट व्हायरल

विद्या बालनने (Vidya balan) ‘दो और दो प्यार’ अशी एक पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टनंतर चाहते तिला शुभेच्छा देताना दिसले.मात्र, नंतर तीने अजून एक पोस्ट करत याचा मोठा खुलासा केला. त्यात विद्या प्रेग्नंट नसून तिच्या आगामी चित्रपटाचे नाव हे ‘दो और दो प्यार’असल्याचे तीने सांगितले.

या चित्रपटात विद्यासोबत अभिनेता प्रतिक गांधी (pratik gandhi) मुख्य भुमिकेत दिसणार आहे. यासोबतच इलियाना डिक्रूज आणि सेंथिल राममूर्ति हे कलाकारदेखील मुख्य भुमिकेत असणार आहेत. हा चित्रपट मार्च महिन्यात 29 तारखेला रिलीज होणार आहे. ही पोस्ट करत विद्याने त्याला ‘दो और दो मिलेंगे, प्यार के राज खुलेंगे’, असे कॅप्शन दिले आहे. अप्लॉज एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे चाहत्यांना तिच्या या आगामी चित्रपटाची प्रतिक्षा असणार आहे.

‘या’ चित्रपटात दिसणार विद्या बालन

अभिनेत्री विद्या बालन (Vidya balan) ‘नियत’ या चित्रपटात शेवटी दिसली होती.तर, अभिनेता प्रतिक गांधी हा ‘अतिथि भूतो भव’ य चित्रपटात दिसला होता. आता हे दोन्ही कलाकार ‘दो और दो प्यार’ मध्ये एकत्र दिसून येणार आहेत. विद्याने या चित्रपटाची पोस्ट आपल्या सोशल मिडियावर केली आहे.

या पोस्टपुर्वी अनेकांनी ती गरोदर असल्याचे म्हटले होते. मात्र, या पोस्टनंतर हा गैरसमज तीने दुर केला. विद्याने 14 डिसेंबर 2012 मध्ये फिल्ममेकर सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले. त्यांना अजूनही अपत्ये झाली नाहीत. या पोस्टमुळे विद्या बाळाला जन्म देणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या अफवा असल्याचे नंतर समोर आले.

News Title- Vidya balan post goes viral

महत्वाच्या बातम्या- 

Vivah Muhurta 2024 l लग्नाळुंसाठी नवं वर्ष जाणार आनंदाचं! जाणून घ्या 2024 मधील विवाह मुहूर्त

IND vs AFG Super Over Match l Rohit Sharma पहिल्या सुपर ओव्हरमध्ये ‘आऊट’, तरी दुसऱ्या सुपर ओव्हरला बॅटिंगला कसा उतरला?, काय सांगतो नियम

Best tourist destinations near Pune | पुण्यापासून 150 किमीच्या आत असलेल्या या पर्यटनस्थळांना आवर्जून भेट द्या

Virat Kohli l शून्यावर आऊट झाला विराट कोहली, मात्र कोहली नसता तर भारत हरला असता, कारण…

SIP Tips to Invest l SIP मध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? मग त्याआधी या गोष्टी लक्षात घ्या