Flu and Chest Congestion | कफ आणि खोकल्याला त्वरित आराम देईल ‘हा’ आयुर्वेदिक काढा; जाणून घ्या बनवण्याची पद्धत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Flu and Chest Congestion | हिवाळ्यात बऱ्याच जणांना कफ आणि खोकल्याचा त्रास (Flu and Chest Congestion) होतो. कफमुळे श्वास घ्यायला प्रचंड त्रास होतो. या समस्येवर आता तुम्ही घरगुती उपाय करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला एक काढा बनवण्याची गरज आहे. तो कसा बनवावा आणि त्याचे सेवन कधी करावे, याची सर्व माहिती तुम्हाला इथे कळणार आहे.

थंडीत कफ होण्याची शक्यता अधिक असते.यासाठी तुम्ही आयुर्वेदिक आल्याचा काढा बनवू शकता. या आयुर्वेदिक काढयाचे अनेक फायदे देखील आहेत. हा काढा पिण्याने प्रतिकारशक्ती देखील वाढते. तसेच, कफ आणि खोकल्याला त्वरित आराम मिळतो.

‘असा’ बनवा आयुर्वेदिक काढा-

कफ आणि खोकल्यावर प्रभावी ठरणारा (Flu and Chest Congestion) आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी सर्वांत महत्वाचा पदार्थ म्हणजे आल्याचा वापर केला जातो. यासाठी एका पातेल्यात एक ग्लास पाणी टाकून त्यात काळी मिरी, तुळशीची पाने, एक मोठे तमालपत्र, कच्च्या हळदीचा एक तुकडा, दालचीनीची एक काडी, गूळ आणि आले घालून त्याला चांगले उकळून घ्या. साधारण 20 ते 25 मिनिटे हे पाणी चांगले उकळून घ्या. उकळून यातील पाणी अर्धे झाले की ते एका ग्लासमध्ये गाळून घ्या. थोडे थंड झाले की, प्या. मात्र, अगदीच थंडही होऊ देऊ नका. कोमट झाले की, त्याचे सेवन करा. तुम्ही गरम पिले तर अधिकच चांगले होईल.

काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात एक ग्लास पाणी टाकून त्यात काळी मिरी, तुळशीची पाने, एक मोठे तमालपत्र, कच्च्या हळदीचा एक छोटा तुकडा, दालचिनीची काडी, गूळ आणि आले घालून उकळा. हे साधारण २० मिनिटे उकळू द्या. जेव्हा काढ्याच्या पाण्याचा रंग बदलून ते अर्धे होईल तेव्हा ते एका ग्लासमध्ये गाळून प्या. फक्त गरम काढ्याचे सेवन करावे लागेल याची विशेष काळजी घ्या.

या काढयामध्ये वापरण्यात आलेल्या हळद, आल्यामुळे कफला लगेच आराम मिळतो. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे संयुग कफ पातळ करण्यास मदत करते. तर आल्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म संसर्गाशी लढा देऊन कफ कमी करते. यासोबतच काळी मिरी सर्दी आणि खोकल्याच्या उपचारात फायदेशीर ठरते. त्यामुळे कफ आणि खोकल्याचा त्रास होत असेल हा काढा वापरणे कधीही फायद्याचेच ठरेल.

आल्याचा वापर ठरेल फायदेशीर-

हिवाळ्यात संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. (Flu and Chest Congestion) त्यामुळे हिवाळ्यात आहारात आल्याचा वापर अधिकाधिक करायला हवा. तुम्ही रोज आल्याचा चहा देखील घेऊ शकता. आल्याचे सेवन केल्याने घसादुखी आणि सर्दीपासून आराम मिळतो. सर्दी आणि फ्लू झाल्यास आल्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. आले फुफ्फुसात उष्णता निर्माण करून जमा झालेले कफ वितळण्यास मदत करते. म्हणून आल्याचा आहारात वापर करावा.

News Title- Flu and Chest Congestion

महत्वाच्या बातम्या- 

Vivah Muhurta 2024 l लग्नाळुंसाठी नवं वर्ष जाणार आनंदाचं! जाणून घ्या 2024 मधील विवाह मुहूर्त

IND vs AFG Super Over Match l Rohit Sharma पहिल्या सुपर ओव्हरमध्ये ‘आऊट’, तरी दुसऱ्या सुपर ओव्हरला बॅटिंगला कसा उतरला?, काय सांगतो नियम

Best tourist destinations near Pune | पुण्यापासून 150 किमीच्या आत असलेल्या या पर्यटनस्थळांना आवर्जून भेट द्या

Virat Kohli l शून्यावर आऊट झाला विराट कोहली, मात्र कोहली नसता तर भारत हरला असता, कारण…

SIP Tips to Invest l SIP मध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? मग त्याआधी या गोष्टी लक्षात घ्या