Pune News : IPS मॅडमला हवी होती फुकटची बिर्याणी, कारवाईचा बडगा मात्र साध्या पोलीस कर्मचाऱ्यावर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | बिर्याणी हा भारतीय नागरिकांचा आवडता पदार्थ आहे. याच बिर्याणीमुळे तुम्ही अनेकदा लग्न मोडल्याचे ऐकले असेल. किंवा भांडण झाल्याचेही ऐकले असेल. मात्र, फक्त बिर्याणी मागितल्यामुळे एका पोलिस कर्मचाऱ्याचे वेतनवाढ रोखल्याचे तुम्ही पहिल्यांदाच ऐकले आहे का? त्यात अजब गोष्ट म्हणजे बिर्याणीची ऑर्डर या कर्मचाऱ्याने नव्हे तर दुसऱ्यानेच दिली होती. हा प्रकार आपल्याच राज्यात म्हणजेच पुण्यात (Pune News) घडला आहे.

या घटनेची पुण्यात एकच चर्चा रंगली आहे. पुणे येथील तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे (Priyanka Naranware) या बिर्याणी प्रकरणामुळे चर्चेत आल्या होत्या. IPS प्रियंका नारनवरे यांनी एका हॉटेलमधून फुकट बिर्याणी मागितली होती. मात्र, याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर हा विषय चर्चिला गेला होता.

नेमके प्रकरण काय?

सदरील प्रकरण (Pune News) तसे जुने आहे. मात्र, त्याची चर्चा अजूनही रंगत आहे. त्याचे झाले असे की, आयपीएस प्रियंका नारनवरे यांनी हॉटेलमधून फुकट बिर्याणी मागितली होती. बिर्याणी मागवल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर नंतर व्हायरल झाली. यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देखील उमटल्या. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

या प्रकरणी नंतर आता ऑडिओ क्लिप व्हायरल करणारे पोलीस कर्मचारी महेश नाईक (Mahesh Naik) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नाईक यांची 3 वर्षांसाठी वेतनवाढ रोखण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. महेश नाईक यांच्यावर पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप करण्यात आला आहे. बिर्याणी मागवणाऱ्या आयपीएस मॅडम ऐवजी कर्मचाऱ्यावर झालेली ही कारवाई अनेकांच्या पचनी पडलेली नाही.

Pune News- “मटन बिर्याणी, प्रॉन्स आणि नॉनव्हेज डिश..”

प्रियंका नारनवरे यांनी मटन बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एक नॉनव्हेज डिश ऑर्डर करण्यास कर्मचाऱ्याला सांगितले. चांगली चव आणि तेलकट व तिखट बघूनच बिर्याणी आणा, असे त्यांनी सांगितले. तसेच, हॉटेल आपल्या कार्यक्षेत्रात असेल तर पैसे देण्याची गरज नाही, असेही त्या म्हणाल्या. हीच ऑडिओ क्लिप जुलै 2021 मध्ये व्हायरल झाली होती.

हे प्रकरण 2020 मध्ये पुण्यात (Pune News) घडले होते. प्रियंका नारनवरे यांच्या संभाषणाची रेकॉर्डिंग विना परवानगी जतन केल्यामुळे महेश नाईक यांच्यावर कारवाई करण्यात आली. पुणे शहर पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी महेश नाईक यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश काढले आहेत. मात्र, कर्मचाऱ्याने पूर्वी आपण पैसे देऊनच जेवण मागवत होतो, परंतू डीसीपी मॅडमने पैसे देण्यास नकार दिला आणि फुकट जेवण मागवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. हे प्रकरण आता चर्चेत आले आहे.

News Title- Pune News employee mahesh naik pay hike blocked

महत्वाच्या बातम्या- 

Vivah Muhurta 2024 l लग्नाळुंसाठी नवं वर्ष जाणार आनंदाचं! जाणून घ्या 2024 मधील विवाह मुहूर्त

IND vs AFG Super Over Match l Rohit Sharma पहिल्या सुपर ओव्हरमध्ये ‘आऊट’, तरी दुसऱ्या सुपर ओव्हरला बॅटिंगला कसा उतरला?, काय सांगतो नियम

Best tourist destinations near Pune | पुण्यापासून 150 किमीच्या आत असलेल्या या पर्यटनस्थळांना आवर्जून भेट द्या

Virat Kohli l शून्यावर आऊट झाला विराट कोहली, मात्र कोहली नसता तर भारत हरला असता, कारण…

SIP Tips to Invest l SIP मध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? मग त्याआधी या गोष्टी लक्षात घ्या