Esha Deol | बॉलिवुड अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांची लाडकी लेक ईशा देओल (Esha Deol) हिच्या आयुष्यात मोठं वादळ आल्याचे म्हटले जात आहे. ईशाच्या पतीचे परक्या महिलेसोबत संबंध असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लवकरच ईशा देखील घटस्फोट घेणार असल्याची माहीत मिळत आहे. या चर्चा असतानाच तीने केलेली एक पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.
ईशाने केलेली पोस्ट अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. तीने पोस्ट करताना दिलेले कॅप्शन अनेक तर्क लावले जात आहेत. ईशा पती भरत तख्तानी पासून विभक्त राहत असल्याचेही म्हटले जाते आहे. एका रेडिट युजरने केलेल्या पोस्टमध्ये यांच्या आयुष्यातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. अशातच ईशाची पोस्ट आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधते आहे.
ईशा देओलची पोस्ट व्हायरल
ईशा देओलने (Esha Deol ) पोस्ट म्हटले की, “11 जानेवारीला माझ्या डेब्यू फिल्मला रिलीज होऊन तब्बल 23 वर्ष पूर्ण झाली. मात्र, मला याची पोस्ट करायला वेळच मिळाला नाही. म्हणून आता हा व्हिडिओ शेअर करत आहे. 18 वर्षांची असताना मी हा चित्रपट केला. माझा हा चित्रपट कायम माझ्यासाठी खास राहील.”, अशी पोस्ट ईशा देओलने केली आहे.
View this post on Instagram
तसेच पुढे तीने, ‘काही वेळा तुम्हाला सोडून द्यावे लागते.. आणि फक्त तुमच्या हृदयाच्या ठोक्यावर नाचत राहावे.’, असेही म्हटले. ईशाने आपल्या सांसारिक जीवनाबद्दल पोस्टमध्ये काहीच नाही म्हटले. मात्र, तिच्या कॅप्शनमुळे सोशल मिडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
घटस्फोटाच्या चर्चा का सुरू झाल्या?
एका ‘रेडिट’ युजरने ईशा (Esha Deol ) आणि भरत विभक्त झाल्याचे म्हणत पोस्ट केली आहे. यासोबतच त्याने अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत.’ईशा देओल तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. तिने पतीसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं बंद केलं आहे.’,असे या युजरने म्हटले आहे. यासोबतच भरतचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा देखील दावा या युजरने केला आहे.
ईशाचा (Esha Deol ) पती भरत न्यू इयरच्या दिवशी बेंगळुरू येथे एका पार्टीमध्ये गर्लफ्रेंडसोबत दिसून आला. भरतची ही गर्लफ्रेंड बेंगळुरू येथेच राहात असल्याचा दावाही या युजरने केला आहे. या पोस्टनंतर सोशल मिडियावर
ईशाच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. ईशा आणि उद्योजक भरत तख्तानी (Bharat Takhtani) यांनी 29 जून 2012 मध्ये इस्कॉन मंदिरात लग्न केले होते. त्यांना दोन मुलीदेखील आहेत. या जोडप्याला एकत्र शेवटी 2023 मध्ये हेमा मालिनी यांच्या वाढदिवशी पाहण्यात आले. यानंतर ते पुन्हा सोबत दिसलेच नाही.
News Title- Esha Deol post goes viral
महत्वाच्या बातम्या-
Vivah Muhurta 2024 l लग्नाळुंसाठी नवं वर्ष जाणार आनंदाचं! जाणून घ्या 2024 मधील विवाह मुहूर्त
Virat Kohli l शून्यावर आऊट झाला विराट कोहली, मात्र कोहली नसता तर भारत हरला असता, कारण…
SIP Tips to Invest l SIP मध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? मग त्याआधी या गोष्टी लक्षात घ्या