Sachin Tendulkar चा 50 व्या वर्षीही जलवा ‘कायम’, इरफान पठाणचा ‘विजयी’ षटकार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sachin Tendulkar | भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या सामन्याने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. अखेरच्या ट्वेंटी-२० सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. दोन सुपर ओव्हर खेळवल्या गेल्या तेव्हा सामन्याचा विजेता ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच दोन सुपर ओव्हर पाहायला मिळाल्या. रोहित शर्माने शानदार शतक झळकावले आणि त्यानंतर अखेरीस विजयही टीम इंडियाच्या खात्यात आला अन् भारताने 3-0 ने मालिका खिशात घातली. बुधवारी या सामन्याने चाहत्यांचे लक्ष वेधले, तर गुरूवारी माजी खेळाडूंनी चाहत्यांना भुरळ घातली.

सचिन पुन्हा एकदा मैदानात

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा खेळपट्टीवर पाय ठेवत 50 व्या वर्षी ही आपली जादू दाखवून दिली. 10 वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला सचिन तेंडुलकर मागील काही वर्षांत अधूनमधून मैदानावर खेळताना दिसत होता. पण मागील काही दिवस क्रिकेटच्या मैदानात सचिनची झलक दिसली नव्हती. त्यामुळे त्याचे चाहते 18 जानेवारीची वाट पाहत होते. कारण या दिवशी श्री साई मधुसूदन साई ग्लोबल ह्युमनॅटरिअन मिशनने वन वर्ल्ड वन फॅमिली कप सामन्याचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत सचिन तेंडुलकरसह इतरही दिग्गजांनी सहभाग नोंदवला. जगातील काही प्रसिद्ध माजी खेळाडू देखील सहभागी झाले होते. हा सामना प्रदर्शनीय असला तरी तो रोमांचक ठरला आणि शेवटच्या षटकात सामन्याचा निकाल लागला. भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने त्याचाच भाऊ युसूफ पठाणच्या गोलंदाजीवर विजयी षटकार लगावला.

Sachin Tendulkar ची अष्टपैलू खेळी

सचिन तेंडुलकर या सामन्यातून वयाच्या 50 व्या वर्षी मैदानात परतला. सचिनला पाहण्यासाठी सर्वजण आतुर झाले होते आणि या महान भारतीय फलंदाजाने कोणालाही निराश केले नाही. सचिन आपल्या फलंदाजीचा पराक्रम दाखवेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती आणि सचिनने ते करूनही दाखवले. याशिवाय मास्टर ब्लास्टरने गोलंदाजी करूनही चाहत्यांचे मनोरंजन केले. या सामन्यात सचिनने 2 षटकात 23 धावा दिल्या आणि एक बळी घेतला.

सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवराज सिंगचा झेल घेण्यातही सचिनला यश आले. यानंतर सचिनने आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवत अवघ्या 16 चेंडूत 27 धावा केल्या. त्याने या धावा 168.8 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने केल्या, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि एक शानदार षटकार आला. महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने सचिनला बाद केले.

 

इरफान पठाणचा विजयी षटकार

इरफान पठाणच्या षटकारामुळे सचिनच्या संघाला सामना जिंकण्यात यश आले. सचिन वन वर्ल्ड संघाचे नेतृत्व करत होता, तर वन फॅमिली संघाची कमान युवराज सिंगच्या हाती होती. युवराजच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात सचिनच्या संघाने अखेरच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. सचिनच्या संघाला विजयासाठी 2 चेंडूत 3 धावांची गरज होती आणि इरफान पठाणने मोठा भाऊ युसूफ पठाणच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकत संघाला 6 गडी राखून विजय मिळवून दिला.

News Title- Sachin Tendulkar was seen playing in the One World One Family Cup and Irfan Pathan hit Yusuf Pathan for a six to win
महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir प्राणप्रतिष्ठेपूर्वी सरकारचे केंद्रीय कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट, घेतला मोठा निर्णय

Vidya balan | अभिनेत्री विद्या बालनच्या घरी पाळणा हालणार?, सर्वात मोठी माहिती झाली उघड

Flu and Chest Congestion | कफ आणि खोकल्याला त्वरित आराम देईल ‘हा’ आयुर्वेदिक काढा; जाणून घ्या बनवण्याची पद्धत

Pune News : IPS मॅडमला हवी होती फुकटची बिर्याणी, कारवाईचा बडगा मात्र साध्या पोलीस कर्मचाऱ्यावर!

Esha Deol | पतीच्या अफेअरच्या चर्चेनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; म्हणाली..