Jaya Bachchan | अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) आपल्या रागीट स्वभावासाठी ओळखले जातात. त्यातच बच्चन कुटुंबामध्ये सध्या तणावाचे वातावरण असल्याचे दिसते आहे. कारण, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या नात्यात सगळं काही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. ऐश्वर्या लवकरच घटस्फोट घेणार असल्याचेही म्हटले जात आहे.
अशातच ऐश्वर्याची सासू म्हणजेच जया बच्चन यांचे एक विधान चर्चेत आले आहे. फिल्म फेस्टिवलमध्ये जया बच्चन यांनी इंटिमेट सीनबाबत मोठे भाष्य केले आहे. तसेच आजच्या सिनेमांवर नाराजी व्यक्त करत संतापही व्यक्त केला. जया बच्चन यांनी ऐश्वर्यावरच हा संताप काढल्याचे सोशल मिडियावर म्हटले जात आहे.
“इंटिमेट सीन करताना काहींना लाज देखील..”
अभिनेता रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांनी ‘ए दिल हे मुश्किल’ मध्ये एकत्र काम केले होते. यात अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील मुख्य भुमिकेत होती. रणबीर आणि ऐश्वर्याने यात अनेक इंटिमेट सीन दिले होते. ऐश्वर्याचा हा सिनेमा तेव्हा जया बच्चन (Jaya Bachchan) यांना आवडला नव्हता. त्यांनी याबाबत नाराजी ही व्यक्त केली होती. आता नुकतेच त्यांनी याबाबत बोलून दाखवले आहे.
“आताच्या सिनेमात लाज नावाची गोष्टच राहिली नाहीये. सध्या लोकं सिनेमे फक्त आणि फक्त पैशांसाठी करतात. त्यातच इंटिमेट सीन करताना काहींना लाज देखील वाटत नाही. त्यामुळे आताच्या सिनेमाचं गांभीर्य नष्ट होत आहे. सर्वांसमोर प्रेमाचे प्रदर्शन केले जात आहे.”, असे जया बच्चन म्हणाल्या आहेत. त्या Jio MAMI च्या 18 व्या मुंबई फिल्म फेस्टिवलमध्ये बोलत होत्या.
जया बच्चन यांच्या विधानाने खळबळ
जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी ऐश्वर्या रायचे नाव नाही घेतले. मात्र, तीने ‘ए दिल हे मुश्किल’ मध्ये इंटिमेट सीन दिल्यामुळे जया बच्चन यांनी यावरच संताप व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा असताना या विधानाने अजूनच फुंकर घातली आहे. सोशल मिडीयावर चाहते देखील आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
ऐश्वर्याने ‘ए दिल हे मुश्किल’ मध्ये साकारलेल्या भुमिकेमुळे बच्चन कुटुंबियांत नाराजी होती, असे अनेकदा म्हटले गेले. सध्या ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. अशात जया बच्चन यांनी विधान केल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, या सर्व चर्चेवर बच्चन कुटुंबियांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
News Title- Jaya Bachchan big statement
महत्वाच्या बातम्या-
Virat Kohli l शून्यावर आऊट झाला विराट कोहली, मात्र कोहली नसता तर भारत हरला असता, कारण…
SIP Tips to Invest l SIP मध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? मग त्याआधी या गोष्टी लक्षात घ्या