Dayaben | ‘ओह मां माताजी’…दयाबेनच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dayaben | ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील सर्वांचे आवडते कॅरेक्टर म्हणजेच ‘दयाबेन’ (Dayaben) लवकरच परतनार असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत आहेत. अशातच एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात दयाबेनच्या भुमिकेत एका नव्या अभिनेत्रीला कास्ट करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पूर्वीची दयाबेन म्हणजेच दिशा वकानी नाही तर एका दुसऱ्याच अभिनेत्रीची सध्या चर्चा होत आहे.

या सर्व चर्चेची सुरुवात एका व्हिडिओ मुळे झाली आहे. झाले असे की, ‘बिग बॉस 17’ मधील स्पर्धक ऐश्वर्या शर्माने आपल्या इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली आहे. यात तीने ‘दयाबेन’ची मिमिक्री केली आहे. तिची मिमिक्री बघून खरोखरच दयाबेनचा भास होतोय.  हा व्हिडिओ  नंतर क्षणात व्हायरल झाला. यावर चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

सोशल मिडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ

ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) आणि तिचा पती नील भट्ट (Neil Bhatt) दोघेही सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव असतात. अशातच त्यांनी एक लाईव्ह व्हिडिओ केला होता. या दरम्यान चाहत्यांनी ऐश्वर्याला दयाबेनची (Dayaben) अॅक्टिंग करण्यास सांगितले. त्यावर ऐश्वर्याने लगेच ‘ओह मां माताजी.. टप्पू के पापा’, अशी मिमिक्री केली. ऐश्वर्याने हुबेहूब दिशा वकानी सारखा आवाज काढला.या व्हिडिओला बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया दिल्या.

काही चाहत्यांना ऐश्वर्याची मिमिक्री प्रचंड आवडली. त्यामुळे त्यांनी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये दयाबेनच्या भूमिकेसाठी ऐश्वर्याला कास्ट करा, अशी मागणीच केली. तर, काही युजरने म्हटले की, ‘दयाबेनचा रोल कुणी आवाजाची नकल केली म्हणून मिळू नाही शकत. पूर्वीचीच दयाबेन भारी आहे.’ अशा प्रतिक्रिया ऐश्वर्याच्या व्हिडिओवर उमटत आहेत. दिशा वकानीने (Disha Vakani) 2017 नंतर मालिका सोडली आहे. तिच्या चाहत्यांना वर्षांपासून तिची प्रतिक्षा आहे. तर, काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार निर्माते असित कुमार मोदी ‘दयाबेन’च्या भूमिकेसाठी कलाकाराच्या शोधात असल्याचे म्हटले जात आहे.

‘ती’ अभिनेत्री नेमकी कोण?

अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा ही ‘गुम है किसी के प्यार में’या मालिकेपासून प्रसिद्धीस आली. यात तीने ‘पत्रलेखा’ नावाची भूमिका साकारली होती. याच मालिकेत मुख्य भुमिकेत असणारा अभिनेता नील भट्ट याच्याशी तिची प्रेमाची गाठ बनली. पुढे त्यांनी लग्नही केले. आता ती ‘दयाबेन’ या भूमिकेच्या मिमिक्रीमुळे (Dayaben) चर्चेत आली आहे.

नुकत्याच या जोडीने ‘बिग बॉस 17’ मध्ये सहभाग घेतला होता. दोघेही बिग बॉस विजेत्याचे पक्के दावेदार म्हटले जात होते. मात्र, दोघेही यातून बाहेर पडले आहेत. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर ते सोशल मिडिया वर अॅक्टिव राहुल चाहत्यांच्या संपर्कात असतात.

News Title- Aishwarya Sharma mimicked Dayaben

महत्वाच्या बातम्या- 

Vivah Muhurta 2024 l लग्नाळुंसाठी नवं वर्ष जाणार आनंदाचं! जाणून घ्या 2024 मधील विवाह मुहूर्त

IND vs AFG Super Over Match l Rohit Sharma पहिल्या सुपर ओव्हरमध्ये ‘आऊट’, तरी दुसऱ्या सुपर ओव्हरला बॅटिंगला कसा उतरला?, काय सांगतो नियम

Best tourist destinations near Pune | पुण्यापासून 150 किमीच्या आत असलेल्या या पर्यटनस्थळांना आवर्जून भेट द्या

Virat Kohli l शून्यावर आऊट झाला विराट कोहली, मात्र कोहली नसता तर भारत हरला असता, कारण…

SIP Tips to Invest l SIP मध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? मग त्याआधी या गोष्टी लक्षात घ्या